शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जालन्यात आयसीटीचे शुक्रवारी भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:22 IST

सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्तारित शाखेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी जालना दौऱ्यावर येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथून जवळच असलेल्या सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्तारित शाखेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी जालना दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार असून, त्या नंतर मुख्यमंत्री फडणवीस एका हॉटेलमध्ये आयोजित सभेत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. सुभाष झांबड, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जि. प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी आ. अरविंद चव्हाण, माजी आ. विलासराव खरात, भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, कुलपती डॉ. रघुनाथ माशेलकर, मनोज पांगारकर, आशिष मंत्री आदींची उपस्थिती राहणार आहे.आयसीटी ही संस्था जालन्यात आल्यानंतर या भागातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांती होईल असा दावा संयोजकांनी केला आहे.ही संस्था जालन्यात यावी म्हणून सत्तेतील सर्वच लोकप्रतिनिधींनी तसेच आयसीटीच्या जालना, औरंगाबोदतील माजी विद्यार्थी, उद्योजकांनी विशेष प्रयत्न केले. मोठ्या पाठपुराव्या नंतर ही अत्यंत प्रतिष्ठेची संस्था जालन्यात होणार असून, याचा लाभ संपूर्ण मराठवाड्यातील युवकांना होणार आहे. सध्या या संस्थेसाठी ३९७ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. ही संस्था २०३ एकर परिसरात उभी राहणार असून, बारावी विज्ञान नंतर त्यात पाच वर्षाच्या एमटेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस