शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी समाज व्यवस्थेसाठी भगतसिंग अभ्यासण्याची गरज..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:16 IST

समाजवादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी तरुणांनी भगतसिंग मुळातून अभ्यासावेत, आवाहन डॉ. मारोती तेगमपुरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भगतसिंगांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्यासाठी युवकांनी विवेकनिष्ठ होऊन समतेवर आधारलेला समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज देशातील वातावरण विवेकाला मारक आहे. असं म्हटलं जात की, ज्यांना चिकित्सा नको असते ते हळूहळू ज्ञानाचेच विरोधक होत जातात आणि ते नवनिर्मितीचेच शत्रू बनतात. या सर्व बाबींना छेद द्यायचा असेल तर भगतसिंग यांचे विचार आणि जीवन मुळातून समजून घेतले पाहिजे. समाजवादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी तरुणांनी भगतसिंग मुळातून अभ्यासावेत, आवाहन डॉ. मारोती तेगमपुरे यांनी केले.जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शहीद भगतसिंग विचारमंच आयोजित शहीद भगतसिंग व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या वर्षीच्या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राचे प्रा. सुधाकर शेंडगे यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबड येथील गोदावरी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांची उपस्थिती होती. मंचावर प्राचार्य डॉ सुनंदा तिडके, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, सय्यद शाकेर, अनुराधा हेरकर, सुनील रत्नपारखे यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना प्रा. सुधाकर शेंडगे म्हणाले, भगतसिंग यांच्या विचारांची आवश्यकता पाहण्याअगोदर भगतसिंग यांना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज प्रत्येक महापुरुषांचे दैवीकरण करण्याचे काम सुरू असून, तरुण मात्र यामध्ये गुरफटत जात आहेत. आज देशातील तरुणांना ख-या अर्थाने भगतसिंगांच्या विचारांची गरज आहे. त्यांच्या विचारातूनच एक समाजवादी राष्ट्र आपण निर्माण करू असे प्रतिपादन प्रा. शेंडगे यांनी केले. अ‍ॅड. अनिल मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Bhagat SinghभगतसिंगSocialसामाजिक