जिल्ह्यात आजवर १३ हजार ४७७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. उपचार सुरू असताना त्यातील ३६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर आजवर १२ हजार ९३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गत काही महिन्यांपासून कोरोना बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाणही तुलनेने खूपच कमी झाले आहे. जिल्ह्यात आढळून येणाऱ्या कोरोना बाधितांमध्ये शहरी भागातील विशेषत: जालना शहर व परिसरातील रूग्णसंख्या अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका कायम आहे. त्यामुळे मकरसंक्रांत सणातील वाण एकमेकींना लूटताना महिलांनीही कोरोनातील प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
लस आली तरी धोका कायम
वाणाला जात असताना किंवा वाण घेण्यासाठी घरात कोणी आले असताना तोंडाला मास्क लावायला विसरू नका. सोबत सॅनिटायझरही आवश्य ठेवा. लस आली म्हणून दूर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे.
कोरोना पसरतोय...
पॉझिटिव्हमृत्यू
१४ जानेवारी २७ ०१
१५ जानेवारी ०९ ०२
१६जानेवारी ०९ ०१
१७ जानेवारी १३ ००
१८जानेवारी १२ ००