शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शेलगावकरांचा ठिय्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:19 IST

बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील संजय अंभोरे खून प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा, इतर आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील संजय अंभोरे खून प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा, इतर आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता.बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील संजय किसनराव अंभोरे हे ७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गावातील रोडलगत असलेल्या पानटपरीवर बसले होते.त्यावेळी तेथे आलेल्या दोघांनी एमआयडीसी येथे कामगार पुरविण्याच्या ठेक्यावरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून गोळीबार करून त्यांचा खून केला. संबंधितांना पकडण्यासाठी गावातील दोघे धावले. त्या दोघांनी गोळीबार केला. मात्र, सुदैवाने ते दोघे बचावले आहेत. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, संजय अंभोरे यांच्या सर्वच मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, या गुन्ह्याचा तपास सीआयडीमार्फत करावा किंवा आतंकवादी विरोधी पथकामार्फत तपास करावा इ. मागण्या यावेळी ग्रामस्थांनी केल्या.पोलीस अधीक्षक कार्यालयात अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून कारवाईचे आश्वासन दिले. तसेच एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव यांनीही ग्रामस्थांशी संवाद साधून उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर उपस्थितांनी जिल्हाधिकारी कार्यालयातही ठिय्या मांडून मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राजू अंभोरे, सुधाकर अंभोरे, सुखदेव अंभोरे, अंकुश अंभोरे, सहदेव अंभोरे, अर्जुन उढाण, गजान अंभोरे, मुक्तीराम बिडवे, भगवान खरात, कृष्णा वाघमारे, संजय अंभोरे, शेख हफिज, शिवाजी अंभोरे, राम जाधव, संदीप वैद्य, गणेश वाघमारे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.निवेदनात इशारा: तर विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकूशेलगाव ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा दंडाधिकारी यांनाही दिले आहे. २० आॅक्टोबरपर्यंत सर्वच आरोपींना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.आरोपींना अटक झाली नाही तर विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनMurderखूनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना