राममूर्ती येथे अभिवादन
जालना : तालुक्यातील राममूर्ती येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एस. व्ही. सरोदे, एम. डी. खरात, के. एम. काझी, जे. एम. अन्सारी, संदीप मगर, रामदास सातपुते आदींची उपस्थिती होती.
साहित्याचे वाटप
वाटूर : स्वराज्य ग्रामीण विकास प्रतिष्ठान परतूर व आधार बहुउद्देशिय सेवाभावी संस्था वाटूर यांच्या वतीने गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब गुंजाळ, एकनाथ राऊत, महादेव हिवाळे आदींची उपस्थिती होती.
कडेगाव येथे कार्यक्रम
बदनापूर : तालुक्यातील कडेगाव येथील आरोग्य उपकेंद्रात आयोजित कार्यक्रमात गणेश कोल्हे यांच्या वतीने चादरीचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच भीमराव जाधव, योगेश निंबाळकर, संजय नारळे, दीपाली जाधव, संगीता कोल्हे व इतरांची उपस्थिती होती.
वाहतूक कोंडी कायम
जालना : शहरातील गांधी चमन ते कचेरी रोडवर सतत वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होवू नये म्हणून उपाययोजना करण्याची गरज आहे.