शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 01:09 IST

राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा मोठा परिणाम औद्योगिक आणि व्यापारी शहर असलेल्या जालन्यात जास्त दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा मोठा परिणाम औद्योगिक आणि व्यापारी शहर असलेल्या जालन्यात जास्त दिसून आला. दररोज काही कोटींची देवाण- घेवाण बँक व्यवहारातून होते. ती आता सलग तीन दिवस ठप्प होणार असल्याने रक्कम सांभाळण्याची मोठी जबाबदारी व्यापारी, उद्योजकांवर आली आहे.जालन्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या जवळपास १५ शाखा आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात तालुका आणि गाव पातळीवर मिळून ही संख्या ३४ च्या घरात पोहोचते. विशेष म्हणजे या राष्ट्रीयकृत बँकांच्या संपामुळे सहकारी बँकांचे व्यवहार सुरू असूनही त्याचा कुठलाच उपयोग झाला नाही. बँकेत रक्कम जमा करण्यापलीकडे सहकारी बँकेत कुठलेच व्यवहार झाले नाहीत.दररोज विविध उद्योजक, व्यापाऱ्यांचे लाखो रूपयांचे धनादेश हे सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा होतात. परंतु याचे क्लिअरिंग हाऊस अर्थात वटविण्याचे केंद्र हे एसबीआयमध्ये आहे. त्यातच ही बँकही संपात सहभागी होती. त्याचा मोठा परिणाम व्यवहारावर झाला आहे. सकाळी येथील शिवाजी पुतळा परिसरात पूर्वीची एसबीएच आणि आता बँक विलिनीकरणानंतरच्या एसबीआय बँकेसमोर बँक युनियनच्या पदाधिकारी तसेच सदस्यांनी जोरदार निदर्शने केली.मागणी : क्लिअरिंग हाऊस नियमित सुरूच ठेवण्याची गरजराष्ट्रीयीकृत बँक अधिकारी, कर्मचा-यांच्या मागण्या रास्त आहेत, त्याकडे सरकार पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राष्ट्रीयकृत बँकांचा संप होत आहे. असे असले तरी, किमान संप सुरू असताना क्लिअरिंग हाऊस असलेल्या बँकेत किमान दोन अधिका-यांची नियुक्ती करून हे काम सुरू ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा परिणाम सहकारी बँकांवर होणार नाही. आणि धनादेश वटण्यास अडचणी येत नाहीत, असे सहायक सरव्यवस्थापक शिरीष देवळे यांनी सांगितले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रStrikeसंपagitationआंदोलन