शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बालनाट्य निर्मिती हीच नाट्यांकुर महोत्सवाची भरभराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:56 IST

दरवर्षी नव्याने निर्माण होत असलेली बालनाट्य निर्मिती हीच नाट्यांकुरची समृध्द भरभराट आहे, असे प्रतिपादन नाट्यांकुरचे सचिव सुंदर कुंवरपुरिया यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बालनाट्य निर्मिती हे सर्वात कठीण काम आहे. तर बालक हा जगातील सर्वात कठीण प्रेक्षक आहे. नाट्यलेखक लिहिते व्हावेत, नवीन संहिता तयार व्हाव्यात, याच उद्देशाने कार्यरत असलेल्या नाट्यांकुर बालनाट्य महोत्सवात दरवर्षी नव्याने निर्माण होत असलेली बालनाट्य निर्मिती हीच नाट्यांकुरची समृध्द भरभराट आहे, असे प्रतिपादन नाट्यांकुरचे सचिव सुंदर कुंवरपुरिया यांनी विजेत्यांना पारितोषिक वितरण करताना केले.शहरातील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात सुरू असलेल्या ४१ व्या बालनाट्य महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राजेंद्र जैस्वाल हे होते. यावेळी संजय देशमुख, नाट्यांकुरचे अध्यक्ष ध. स. जैन, प्रकल्प प्रमुख आशिष रसाळ, जयेश पहाडे, माया कुंवरपुरिया, शाम जवादे, चैताली जवादे, परीक्षक प्रा. अनंत चौधरी, रूपाली सेठ, सुनीता देशमुख, दिनेश संन्यासी, गुलाबराव पाटील, शशिकांत सैबे यांची प्रमुख उपस्थिती होती.या स्पर्धेत मांडवा येथील बारवाले विद्यालयाचा संघ सर्वोत्कृष्ट ठरला तर समूह नृत्यात किड्स केंब्रिजच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.सुंदर कुंवरपुरिया म्हणाले, नाट्यलेखन होत नाही अशी ओरड केली जाते. मात्र याला अपवाद नाट्यांकुर महोत्सव असून, दरवर्षी १५ एकांकिकांचे नव्याने लेखन होते. दिग्दर्शक, बालकलावंतामधील सृजनशीलतेला प्रकाशात आणणे हीच नाट्यांकुरची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. अनंत चौधरी, दिनेश संन्यासी यांनी मार्गदर्शन केले. संचालन रसाळ यांनी केले. जैन यांनी आभार मानले. एकांकिकेमध्ये बारवाले विद्यालय, मांडवा (सर्वोत्कृष्ट), विठ्ठल. मा. शा. (द्वितीय), जिजामाता प्रा. शा. (तृतीय). प्राथमिक विभाग :- आर. एच. व्ही. स्कूल (प्रथम), दानकुंवर कन्या वि. ((व्दितीय), मराठी कन्यापाठ शाळा (तृतीय), हायल हिंदी :- आर. पी. बदनापूर (प्रथम), आश्लेषा इं. स्कूल (द्तिीय), न्यू पब्लिक स्कूल (तृतीय), ग्रामीण प्राथमिक :- बारवाले मांडवा (प्रथम), किंग्स शिवाजी रेवगाव (व्दितीय), आसाराम पाटील विद्यालय घाणेवाडी (तृतीय) आदी विजेते ठरले आहेत.एकांकिकेच्या सहभागी सर्व अडीच हजार कलावंतांमधून सर्वोत्कृष्ट पुरूष अभिनयाचा मान शुभम चंद (बारवाले विद्यालय, मांडवा) यास मिळाला तर सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनयात प्रियंका ज-हाड (आर.पी. इं. स्कूल बदनापूर) हे मानकरी ठरले. त्यांना स्व. सागर जोशी चषक देण्यात आले.

टॅग्स :artकलाcultureसांस्कृतिकSchoolशाळा