कोरोनाला पळवून लावण्यासाठी सर्वांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे, मास्क लावून घराबाहेर पडले पाहिजे, बाहेरून घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, डिस्टन्सिंग पाळले पाहिजे, असा सल्ला दिला. तसेच सर्वत्र गाजलेले तुला बुरगुंडा होईल गं बया या भारुडासह आंधळा पांगळा, नंदीबैल आदी भारुडे सादर केली.
यावेळी भाकरे यांनी गावातील सैनिकांच्या मातेचा सन्मान केला. सोबतच निर्व्यसनी कुटुंबातील माता, सेंद्रिय शेती करून विषमुक्त अन्नधान्य उत्पादित करणारे शेतकरी कुटुंब, शेतकरी मुलांसोबत लग्न करण्याचा संकल्प करणाऱ्या तरुणींचा सन्मान कार्यक्रम दरम्यान केला. भारुडाच्या माध्यमातून तरुणाईला निर्व्यसनी जीवन जगण्याचा मोलाचा संदेश देऊन निर्व्यसनी होण्याचा संकल्प करणाऱ्या तरुणांंचा रंगमंचावर बोलावून सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय दाभाडे यांनी तर राजू शेळके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला गावातील आबालवृद्धांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.