शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोमोबाईल मंदीचे जालन्यातही पडसाद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 01:02 IST

देशातील आॅटोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका वाहनांचा प्राण असलेल्या बेअरिंग्ज उत्पादन कंपनीला बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : देशातील आॅटोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका वाहनांचा प्राण असलेल्या बेअरिंग्ज उत्पादन कंपनीला बसला आहे. १९८२ पासून जालन्यात अविरत सुरू असलेली सर्वात मोठी कंपनी म्हणून एनआरबीची ओळख आहे. २००८ नंतर प्रथमच कंपनीने उत्पादन कपातीचा निर्णय घेतला आहे. महिन्यातील एक रविवार कंपनी बंद ठेवून कामगारांना वेतनासह सुटी देण्यात येणार आहे. सोमवारी कंपनीची साप्ताहिक सुटी असल्याने दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार असल्याचे कामगार सूत्रांनी सांगितले.जालन्यातील या कंपनीत जवळपास एक हजारपेक्षा कायम कामगार तर जवळपास ३०० पेक्षा अधिक तात्पुरते कामगार अर्थात कॅज्युअल वर्कर यापूर्वीच कंपनीने कमी केल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. एनआरबी कंपनीत छोट्यात - छोट्या गाडीसह चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या बेअरिंग्जचे उत्पादन केले जाते. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आॅटोमोबाईल इंडस्ट्री अडचणीत होती.अनेक बड्या कार उत्पादक कंपन्यांनी उत्पादन घटविल्याने एनआरबीच्या बेअरिंग्जच्या मागणीत घट झाली. त्याचा परिणाम जालन्यातील या सर्वात मोठ्या कंपनीला मंदीची झळ पोहोचली.ही झळ लवकर भरून निघेल, अशी आशा व्यवस्थापनाला होती, परंतु मंदीचे वारे कमी होण्याची चिन्ह नसल्याने व्यवस्थापन आणि कामगारांनी एकत्रित बैठक घेऊन महिन्यात एका आणि वेळ पडल्यास दोन रविवार कंपनी पूर्णपणे बंदी ठेवून उत्पादन कमी करण्यात येणार आहे.साधारपणे २५ टक्के उत्पादन घटणार असल्याने याचा मोठा फटका उद्योगाला बसला आहे.विशेष म्हणजे रविवारी कंपनी बंद ठेवल्याने कंपनीचे वीजबिलासह अन्य नित्याच्या लागणाºया बाबी तसेच अन्य खर्चावर यामुळे नियंत्रण आणणे शक्य असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.आज जरी रविवारी कंपनी बंद ठेवण्यात येणार असली तरी भविष्यात ज्यावेळी मंदीचे मळभ दूर झाल्यावर रविवार हा सुटीचा दिवस नंतर अतिरिक्त काम करून ही तूट भरून काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले.एलजीबीतील संप : उद्योगविश्व चिंतेतजालन्यातील आॅटोमाबाईल क्षेत्राशी संबंधित एलजीबी ही उत्पादन वाहनांसाठीच्या चेनचे उत्पादन करते. गेल्या आठ दिवसांपासून या कंपनीत कामगार आणि व्यवस्थापनात झालेल्या किरकोळ वादातून संप सुरू आहे. या संपामुळे उद्योग विश्वासह कामगार विश्वात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यात व्यवस्थापन तसेच कामगारांनी देखील एक पाऊल मागे घेऊन संप मागे घ्यावा, यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु हा संप म्हणजे जालन्यातील उद्योगविश्वात चिंता निर्माण करणारा असल्याचा सूर ऐकण्यास मिळत आहे.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगMarketबाजारLabourकामगारEconomyअर्थव्यवस्था