शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पिस्तूल विक्रेत्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:27 IST

जिल्ह्यात अवैधरीत्या पिस्तूल विक्री करणाऱ्यांचे जाळे उध्दवस्त करण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दरोडा प्रतिबंधक पथकाने अंबड येथे कारवाई करून एक गावठी पिस्तूल जप्त केले. जिल्ह्यात आजवर आठ पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. पिस्तूल कोठून आणल्या जातात याचा शोध सुरू आहे. जिल्ह्यात अवैधरीत्या पिस्तूल विक्री करणाऱ्यांचे जाळे उध्दवस्त करण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिली.अंबड येथील अक्षय भिमराव शिंगाडे (रा. विकास नगर, अंबड) याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकाचे (एडीएस) प्रमुख पोनि यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि यशवंत जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी सकाळी अंबड येथे सापळा रचला. अक्षय शिंगाडे हा पिस्तूल घेऊन घरून बसस्थानकाकडे जात होता. पोलिसांनी अंबड येथील बसस्थानकाजवळील एका ज्युस सेंटर समोर कारवाई करून अक्षय शिंगाडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीत असलेली ४० हजार रूपये किंमतीची गावठी पिस्तूल जप्त केली. या प्रकरणी पोहेकॉ नंदू खंदारे यांच्या तक्रारीवरून अक्षय शिंगाडे विरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोनि यशवंत जाधव, पोहेकॉ नंदू खंदारे, पोहेकॉ ज्ञानदेव नागरे, पोना किरण चव्हाण, गजानन भोसले, पोकॉ सचिन आर्य, नाथा दिवटे आदींच्या पथकाने केली.दरम्यान, पिस्तूल प्रकरणातील पुढील तपासाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.युवकाचे अडत दुकानदरोडा प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतलेल्या अक्षय शिंगाडे याचे आडत दुकान आहे. त्यामुळे शिंगाडे याने पिस्तूल कोणत्या कारणासाठी घेतली आणि ती कोणाकडून विकत घेतली? याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.परतूर प्रकरणात मागविला अहवालपरतूर येथील एका अल्पवयीन मुलीने मुंबई येथे जाऊन उपोषण केले होते. त्यामुळे आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आणि त्याची कागदपत्रे आल्यानंतर परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात उपविभागीय अधिका-यांकडून परतूर पोलीस ठाण्याचा अहवाल मागविला असून, या प्रकरणात कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाईल, असे एस. चैतन्य यांनी सांगितले...तर खात्यांतर्गत चौकशीपिस्तूल विक्री प्रकरणात अटक केलेल्या वनारसे याचे वडील पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांना मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी कोणी तक्रारी केल्याचे दिसून येत नाही. पिस्तूल विक्री प्रकरणात त्यांचा मुलगा अटकेत असून, त्याची चौकशी सुरू आहे. गरज पडली तर त्याच्या वडिलांची खात्यांतर्गत चौकशी केली जाईल, असे एस. चैतन्य यांनी सांगितले.पोलिसांचा तपास : परराज्याशी कनेक्शन्जालना जिल्ह्यात सापडलेल्या पिस्तूल विक्रेत्यांचे जाळे जालना ते मध्यप्रदेश, राजस्थानपर्यंत असण्याची शक्यता आहे. आम्ही त्या दृष्टीने तपास करीत आहोत. पिस्तूल विक्री प्रकरणात आजवर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, पिस्तूल विक्रीतील धागेदोरे हाती लागतील. गरज पडली तर इतर राज्यातील पोलिसांची मदत घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे एस. चैतन्य यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाJalna Policeजालना पोलीस