बँक अधिकाऱ्यास मारहाण करून अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:21 AM2021-06-18T04:21:39+5:302021-06-18T04:21:39+5:30

परंतु, मी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेऊन मोटारसायकलवरून थेट जालना गाठले. मला नेमकी मारहाण कशामुळे केली, हे समजू ...

Attempted kidnapping by beating a bank official | बँक अधिकाऱ्यास मारहाण करून अपहरणाचा प्रयत्न

बँक अधिकाऱ्यास मारहाण करून अपहरणाचा प्रयत्न

Next

परंतु, मी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेऊन मोटारसायकलवरून थेट जालना गाठले. मला नेमकी मारहाण कशामुळे केली, हे समजू शकले नाही. तसेच मला गाडीत बसवून मला कुठे नेणार होते, हे देखील एक गूढ आहे. या प्रकारामुळे आपण धास्तावलो असून, मारहाण करणाऱ्यांच्या तोंडाला पट्टी होती. असे बोरसे यांनी पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांना सांगितले. शेळके यांनी तातडीने याची दखल घेत ज्या भागात मारहाण झाली, तेथे पोलिसांना पाठविले. परंतु, तोपर्यंत मारहाण करणारे पळून गेले होते. दोन दिवसांपूर्वी अशीच मारहाण करून एकाला लुटण्याचा प्रयत्न या भागात झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Attempted kidnapping by beating a bank official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.