शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळूचा ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:44 IST

बामखेडा येथील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करुन वाहतूक करीत असलेले वाहन बामखेडा येथील ग्रामस्थांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बामखेडा येथील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करुन वाहतूक करीत असलेले वाहन बामखेडा येथील ग्रामस्थांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.संतप्त ग्रामस्थांनी अवैध वाळूचा उपसा करुन वाहतूक करणाऱ्या हायवा क्र.एम.एच.२० ई.जी.७१४४, ट्रक क्र,एम.एच. २० सी.टी.२३३३ आणि विना पासिंग जेसीबी महसूल व पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. यावेळी ग्रामस्थांचा पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचा-यांसोबत शाब्दिक चकमक झाली.यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु अवैध वाळू उपशा वर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. या परिसरातील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा जेसीबी यंञाद्वारे रात्रंदिवस सुरु आहे. याकडे महसूल आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. दिवसाढवळ्या महसूल आणि पोलीस विभागाच्या डोळयासमोर त्यांच्या नाकावर टिच्चून वाळूचा उपसा आणि वाहतूक सुरू असते.असे असतानाही कारवाई होत नसल्याने वाळू माफियांची चलती आहे. यातूनच सोमवारी सकाळी बामखेडा पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करुन वाहतूक करीत असलेल्या या वाहन चालकांनी बामखेडा येथील ग्रामस्थांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. सदरील व्यक्ती आपल्या मुलांना घेऊन दुचाकीवर शाळेत सोडण्यासाठी केदारखेडा येथे येत होता.संबंधित प्रकारामुळे बामखेडा येथील ग्रामस्थ संतप्त झाले, त्यांनी वाळूची वाहतूक करीत असलेली दोन वाहने व जेसीबी पकडले. या प्रसंगी नायब तहसिलदार के.टी. तांगडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे यांनी मध्यस्थी केली.

टॅग्स :sandवाळूCrime Newsगुन्हेगारीRevenue Departmentमहसूल विभाग