शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतात शौचास बसण्यास विरोधातून मायलेकाचा खून; बाप,मुलगा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 10:39 IST

किरकोळ कारणावरून वाद वाढला आणि कुटुंबावर हल्ला करण्यात आला

जालना : शौचालयास बसण्यास विरोध केल्याच्या कारणावरून मायलेकाचा चाकूचे वार करून खून करण्यात आल्याची घटना जालना तालुक्यातील एरंडवडगाव (अचानक तांडा) येथे शुक्रवारी रात्री घडली. यात दोघे जण ठार झाले असून, दोघे जण गंभीर जखमी आहे. सुमनबाई देविलाल सिल्लोडे (४५), मंगेश देविलाल सिल्लोडे (२०) अशी मयतांची नावे आहेत. तर योगेश देविलाल सिल्लोडे (१८), देविलाल सिल्लोडे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. 

एरंडवडगाव शिवारात असलेल्या अचानक तांडा येथे देवीलाल सिल्लोडे यांची गावाजवळच शेती आहे.  या शेतात गावातील शिंदे कुटुंबातील काही मुले सराईत चोरटे असून, ते रात्री चोऱ्या करून आल्यानंतर लपून बसतात. यावरून शिंदे आणि सिल्लोडे यांच्या नेहमी वाद होत होते. शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास काही महिला सिल्लोडे यांच्या शेतात शौचालयास बसल्या होत्या. त्याचवेळी देविलाल सिल्लोडे हे गावातून घराकडे येत होते. त्यांनी महिलांना शौचालयास बसण्यास विरोध केला. त्यावरूनच वादा-वादी झाली. त्याचवेळी काही जणांनी देविलाल सिल्लोडे यांना मारहाण केली.

 देविलाल सिल्लोडे यांनी मुलांना आवाज दिला. तेव्हा दोन्ही मुले मंगेश, योगेश व त्यांची आई सुमनबाई यांनी धाव घेतली. त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, चौघांनी मंगेशच्या पोटात चाकूने वार केले. त्यानंतर सूमनबाई यांच्याही पोटात चाकूने वार करून त्यांना जखमी करण्यात आले. योगेशच्या पाठातही चाकूचा वार करण्यात आला. तर देविलाल यांना बेदम मारहाण करण्यात आली.

 या सर्वांना सुरूवातील नेर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून जालना येथे रेफर करण्यात आले. डॉक्टरांनी मंगेश व सूमनबाई यांना तपासून मयत घोषित केले.  तर देविलाल सिल्लोडे व योगेश सिल्लोडे यांच्यावर जालना येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना