शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

एटीएम रामभरोसे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:40 IST

विविध बँक ग्राहकांच्या सोयीसाठी असलेले एटीएम सुरक्षेअभावी आता चोरट्यांच्याही सोयीचे होऊ लागल्याचे चित्र शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लोकमत टीमने केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध बँक ग्राहकांच्या सोयीसाठी असलेले एटीएम सुरक्षेअभावी आता चोरट्यांच्याही सोयीचे होऊ लागल्याचे चित्र शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लोकमत टीमने केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले आहे. जिल्ह्यातील चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ४० पैकी काही एटीएम केंद्रांना भेट दिल्यानंतर यापैंकी काही केंद्रे असुरक्षित असल्याचे आढळून आले.गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्हाभरात चोरी प्रमाण वाढले आहे. या अनुषंगानेच लोकमतच्या टिमने शुक्रवारी मध्यरात्री शहरातील एटीएमची पाहाणी केली. मध्यरात्री १२.३० वाजता भोकरदन नाका येथील आयडीबीआय व बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक नव्हता. काही अंतरावरील एसव्हीसी व कॅनरा बँकेच्या केंद्रावर सुरक्षारक्षक होता. यानंतर मंमादेवी येथील युनियन बँकेच्या केंद्रावरही सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले. रेल्वेस्थानक मार्गावरील गांधीचमन येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या एटीएम केंद्रातही सुरक्षारक्षक नव्हता. या केंद्रापासून हकेच्या अंतरावर असलेल्या कॅनरा बँक व युनियन बँकेच्या केंद्रावरही रक्षक दिसून आला नाही. याच परिसरातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या केंद्रावरही सुरक्षा नव्हती. त्यानंतर बडीसडक येथील जवळपास सर्वच एटीएम केंद्राची सुरक्षा रामभरोसेच दिसून आली. पाणीवेस येथील एका एटीएम केंद्रात एक सुरक्षारक्षक झोपलेल्या अवस्थेत दिसून आला. बसस्थानक येथील बँक आॅफ इंडियाच्या केंद्रावरही रक्षक नव्हता. लक्कडकोट चौकासमोरील भागात अ‍ॅक्सिस बँकेचे केंद्रही रक्षकाविनाच होते. मामा चौक परिसरातील एटीएम केंद्रेवरही सुरक्षारक्षक दिसला नाही. जालना शहरात नवीन व जुना जालना भागात मिळून विविध बँकांचे एटीएम ४० मशीन्स आहेत. मात्र बोटावर मोजण्या इतक्याच एटीएमवर सुरक्षा रक्षक होते. बहुतांश बँकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर विश्वास ठेवल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे वर्दळ नसलेल्या रस्त्यांवर तसेच काही संवेदशील भागातही सुरक्षा रक्षक नाहीत. मोजके एटीएम सोडले तरी बहुतांश ठिकाणी आतील बाजूने सीसीटीव्ही आहेत. काही ठिकाणी मशीनच्या दरवावाज्यांचीही मोडतोड झाल्याचे स्पष्ट झाले. एटीएमवर सुरक्षारक्षकच नसल्याची संधी साधत चोरटे मोठा डाव साधण्याची शक्यता नाकारता येत नाही.सीसीटीव्हीवरच सुरक्षेचा भारराष्ट्रीय बँंकांसह सहकारी बँंकांच्या एटीएमची सुरक्षा रामभरोसे असून सीसीटीव्ही यंत्रणेवरच बँंकांची सुरक्षा अवलंबून आहे. शहरात बँंक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँंक, बँंक आॅफ महाराष्ट्र, आयडीबीआय, आयसीआयसीआय या बँंकांसह जिल्हा मध्यवर्ती बँंका कार्यरत आहेत. दररोज करोडो रुपयांची उलाढाल होणाºया या बँंकाच्या एटीएमची सुरक्षा रामभरोसे असून केवळ सीसीटीव्ही यंत्रणेवर एटीएमची सुरक्षा अवलंबून आहे. राष्टÑीयीकृत बँंकाच्या एटीएममध्ये दिवसा सुरक्षारक्षक तैनात असल्याचे दिसून येतात पण एटीएमसमोर रात्री कोणतीही सुरक्षा यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून येत नाही.तालुक्यांमध्येही अशी स्थितीजिल्ह्यातील अंबड, जाफराबाद, भोकरदन, घनसावंगी, बदनापूर, मंठा, परतूर तालुक्यांतील एटीएम केंद्रातही सुरक्षारक्षक नसल्याचे समोर आले आहे.साठीत सुरक्षेची काठीशहरातील काही बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक दिसून आले. परंतु, यासर्व केंद्रावर वयाची साठी पार केलेल्या वयोवृद्ध सुरक्षारक्षकाची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे सुरक्षेसाठी काठीही आढळली नाही.

टॅग्स :atmएटीएमBanking Sectorबँकिंग क्षेत्र