शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चोरटा जेरबंद; सराफाकडून दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 01:11 IST

अनेक चोऱ्यांमध्ये हात असलेल्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील नवीन मोंढा भागातून जेरबंद केले.

जालना : अनेक चोऱ्यांमध्ये हात असलेल्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील नवीन मोंढा भागातून जेरबंद केले. चोराने विक्री केलेले एक लाख ४७०० रूपयांचे दागिने देऊळगाव राजा येथील सराफाकडून जप्त करण्यात आले. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली असून, आरोपीला सदरबाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अशोक शामराव सुरासे (रा. नवीन मोंढा जालना) असे आरोपीचे नाव आहे. जालना शहरातील अनेक घरफोड्यांमध्ये हात असलेला अशोक सुरासे हा शहरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने सुरासे याचा मागमूस काढून गुरूवारी रात्री जालना शहरातील नवीन मोंढा भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गत अडीच महिन्यांपूर्वी नवीन जालना भागातील सकलेचा नगरमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीतील दागिने देऊळगाव राजा येथील एका सराफा व्यापाºयाला विकल्याचे त्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देऊळगाव राजा येथील सराफाला गाठले. त्याची चौकशी करून त्याच्याकडील १ लाख ४७०० रूपये किंमतीचे सोन्याचे ३४ ग्रॅम ९०० मिली दागिने जप्त केले. सुरासे याच्याकडून चोरीच्या इतर घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, दुर्गेश राजपूत, सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, पोकॉ सचिन चौधरी, विलास चेके यांनी केली.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसtheftचोरीArrestअटक