परतूर : येथील बाजारपेठेत सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सहा हजार ३०० रुपयांचा दर मिळत आहे. तुरीची आवक वाढल्याने बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढली आहे.
यावर्षी तालुक्यात रब्बी पीक जोमात आले आहे. कापसापासून शेतकऱ्यांची निराशा झाली असली, तरी तुरीमुळे शेतक-यांना हातभार लागत आहे. शहरातील मोंढ्यात तुरीची आवकही वाढली आहे. आतापर्यंत ११ हजार ९१ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. तर, मागील वर्षी २२ हजार ८१५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली होती. सध्या तुरीला ६ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. बाजारात यावर्षी जाणकार व प्रतिष्ठित व्यापारी लक्ष घालत असल्याने बाजारापेठेत उत्साह संचारला आहे.
दरम्यान, आमचा कल शेतकऱ्यांना जास्तीतजास्त भाव मिळण्याकडे असतो. शेवटी, मालाची गुणवत्ता व आवक यावरही बरेच अवलंबून असते. असे माजी नगराध्यक्ष प्रदीप लढ्ढा यांनी सांगितले. यावेळी दिनेश होलाणी, बालाजी काबरा, रामदेव राठी, सत्यानाराय राठी, विजय मोर, दत्ता तनपुरे आदींची उपस्थिती होती.
लिलावाद्वारे माल द्यावा
शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीच्या जाहीर लिलावाद्वारेच द्यावा. यात शेतकऱ्यांचे व बाजार समितीचे हित आहे.
आर.बी. लिपणे
सचिव, कृउबा, परतूर
कॅप्शन : परतूर येथील बाजारपेठेत तुरीच्या लिलावात सहभागी झालेले व्यापारी, शेतकरी.