शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पिठोरी सिरसगाव येथे सशस्त्र दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:15 IST

अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे सात लाख रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे सात लाख रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. गत काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.पिठोरी सिरसगाव येथे गावाच्या सुुरुवातीलाच ओमप्रकाश उर्फ यशवंत आबासाहेब उढाण यांचे घर आहे. बुधवारी लाईट नसल्यामुळे रात्री ओमप्रकाश उढाण, मुलगा गोविंद पत्नी मंगलबाई हे घराच्या गच्चीवर झोपले होते. तर मुलगी कोमल ही घरात झोपलेली होती.दरोडेखोरांनी उढाण कुटुंबियांवर पाळत ठेवून मागच्या दरवाजाने घरात प्रवेश केला. गच्चीवर झोपलेल्यांना खाली येता येऊ नये म्हणून दरवाजा जिन्याचा दरवाजाला आतून कडी लावून घेतली. घरात झोपलेल्या कोमलला कोयत्याचा धाक दाखवून कपाटाच्या चाब्या मागितल्या. तिने माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर दरोडेखोरांनी सोबत आणलेल्या लोखंडी गजाने कपाटाचे दरवाजे तोडले.कोमलला आरडाओरडा केल्यास बाहेर उभे असलेली आमची माणसे तुला मारहाण करतील, असे धमकावले. चोरटे कपाटातील सोने ठेवलेले डबे, मोबाईल व कपाटाचे ड्रॉवर घेऊन घरासमोरील उसाच्या शेतात गेले. ड्रॉवरमधील सोन्याचे गंठण, मोहनमाळ लॉकीट, झुंबर, अंगठ्या, पाटल्या, चेन इ. दागिने लंपास केले. त्यानंतर ड्रॉवर ऊसाच्या शेतातच टाकून दिले. शेजारीच राहत असलेल्या धनंजय सुभाष उढाण यांच्या घराकडे मोर्चा वळून त्यांच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.पहाटे घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोंदी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. श्वानाने घरासमोरील उसाच्या शेतापर्यंत माग काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने घटनास्थळी भेट देऊन तपास अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.अंबडमध्ये साईबाबांचा मुकुट चोरलाअंबड: येथील श्रीसाईबाबा मंदिरातील सार्इंच्या डोक्यावरील चांदीचा २५० ग्रॅमचा मुकुट चोरट्यांनी गुरुवारी सकाळी चोरून नेला. शहरातील पाचोड रोडवरील इच्छापूर्ती श्री साईबाबा मंदिरात साईबाबा यांच्या मूर्तीवर दर गुरुवारी चांदीचा मुकुट ठेवण्यात येतो. साईबाबांच्या शेज आरतीनंतर सायंकाळी सातला मुकुट काढून ठेवला जातो. सकाळी सहा वाजता मूर्तीवर ठेवलेला मुकुट चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मंदिराचे रवींद्र बापूराव कारके यांच्या फिर्याद वरुन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :RobberyदरोडाPoliceपोलिस