शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शहागडमध्ये व्यावसिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा; २६ लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 17:12 IST

स्वयंपाकघरातील खिडकीची जाळी काढून केला घरात प्रवेश

शहागड (जालना ) : अंबड तालुक्यातील शहागड येथील एका व्यवसायिकाच्या घरावर शनिवारी पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. रोख रक्कम, दागिन्यांसह तब्बल २६ लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

अंबड तालुक्यातील शहागड येथील व्यावसायिक माणिकलाल जैस्वाल यांचा मोठा मुलगा मनोज जैस्वाल हा कामा निमित्त औरंगाबादला गेला होता. तर छोटा मुलगा, एक मुलगी पती-पत्नी हे चार सदस्य घरी होते. माणिकलाल जैस्वाल नेहमीप्रमाणे दोन बिअरबार, एक देशी दारू दुकान तसेच हॉटेल बंद करून घरी आले. शनिवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात दरोडेखोरांनी जैस्वाल यांच्या घराबाहेर पाळत ठेवली. तर चार दरोडेखोरांनी घरातील व परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडून, काहींचे तोंड फिरवून, तर काहींचे वायर डिस्कनेक्ट करत त्यांना निकामी केले.  बांधकामासाठी वापरात असलेल्या सीडीचा वापर करत किचन खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश केला. 

चोरट्यांनी प्रथम छोटा मुलगा, मुलगी असलेल्या खोलीत प्रवेश केला. मुलांजवळील मोबाईल हिसकावून घेत दार बाहेरून बंद केले. नंतर माणिकलाल यांच्या रूमचे दार लावून घेत त्यांच्या पत्नी असलेल्या बेडरूम मध्ये प्रवेश केला. त्यांनी आरडाओरडा करु नये म्हणून त्याच्या छातीवर पाय ठेवून तलवारीचा धाक दाखवून कपाटातील तिजोरीतील रोख ७ लाख व ५० तोळे सोन्याचे दागिने लुटून घराच्या मागील शेतीमधून पलायन केले.

२५ किलोमीटर अंतर पिंजलेघटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी.शेवगण, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोनि यशवंत जाधव, पोलीस नाईक संजय मगरे, एपीआय शिवानंद देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, धनंजय कवाडे, गोपणीय शाखेचे पो. कॉ.महेश तोटे, बाबा डमाळे आदींनी घटना स्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर दरोडेखोरांच्या शोधार्थ वडी (ता.अंबड) ते गडी  (जि.बिड) असा २५ किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. मात्र, चोरटे हाती लागले नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस