शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सशस्त्र टोळक्याचा धुडगूस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:58 IST

बुुंदेले चौकात सोमवारी दुपारी १२ ते १४ जणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्रे घेऊन धुडगूस घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील बुुंदेले चौकात सोमवारी दुपारी १२ ते १४ जणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्रे घेऊन धुडगूस घातला. एका महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, घटनास्थळी आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याने पिस्तूल रोखल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना शहरातील जेईएस महाविद्यालयानजीकच्या बुंदेले चौक भागात मंगलसिंग ठाकूर यांचे घर आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास १२ ते १४ जणांचे एक टोळके दुचाकीवरून या चौकात आले. शोभा मोहनसिंग ठाकूर (५५) यांच्या घरात घुसून ‘तुम्हारा लडका मंगल कहाँ है, उसने वैभव को क्यो मारा’ असे म्हणत शोभा ठाकूर यांच्यासह त्यांच्या आई, भावास शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच चाकूने गळ्यावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शोभा ठाकूर यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून राहुल ढाकणे, वैभव ढाकणे व इतर १० ते १२ जणांविरूध्द कलम ३०७,४५२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ भादंविसह कलम १३५ म.पो.का. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि जाधव हे करीत आहेत.दरम्यान, घटना घडतेवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ सॅम्युअल कांबळे हे या भागातून जात होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. आक्रमक झालेले टोळके पाहून प्रसंगावधान राखत त्यांनी टोळक्याच्या दिशेने पिस्तूल रोखले. कांबळे यांनी रोखलेले पिस्तूल पाहून युवकांनी तेथून पळ काढला. कांबळे यांनी एका युवकाला ताब्यात घेतले. तोपर्यंत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोउपनि जाधव, पोउपनि रूपेकर, सपोउपनि बनसोडे यांनीही घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना..घटनास्थळावरून पळून गेलेल्या युवकांच्या दुचाकी सदर बाजार पोलिसांनी ताब्यात जप्त केल्या. राहुल ढाकणे, वैभव ढाकणे या दोघांसह इतर काही जणांना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस