शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही; रावसाहेब दानवेंनी समेटानंतरही ऐकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 06:24 IST

खा. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना दानवे म्हणाले, ईडी असो किंवा सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा असून, त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघ ९ वेळा झालेल्या निवडणुकांपैकी ५ वेळा भाजपने जिंकला आहे. ही जमीन ४५ वर्षांपासून आम्ही नांगरत असून, आता त्यात माल येत आहे. ती जमीन आता कुणालाही पाय ठेवायला देणार नाही. हा भाजपचा मतदारसंघ आहे. त्यामुळे अर्जुन खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही, असा स्पष्ट सल्ला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला, तसेच ईडीच्या कारवाईमुळे नाही, तर राजकीय सोयीमुळे खोतकरांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याचेही त्यांनी स्पष्ट  केले.

विभागीय आयुक्तालयात दानवे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, खोतकरांचे क्षेत्र वेगळे, माझे वेगळे आहे. मी लोकसभेचा तर ते विधानसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी विधानसभेवर दावा सांगावा. जालना लोकसभा मतदारसंघ दानवेच्या बापाची जहागिरी नाही. दानवे नसतील तर आ. हरिभाऊ बागडे किंवा अन्य कुणीही लढेल. भाजप हा मतदारसंघ सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगून ते म्हणाले, शिवसेना सोडून शिंदेसेनेत का आले, याचे उत्तर खोतकरच देतील. 

भाजपवर आरोप म्हणजे कृत्यांवर पांघरूणखा. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना दानवे म्हणाले, ईडी असो किंवा सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा असून, त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. लालूप्रसाद यादव असतील, सुरेश कलमाडी यांच्यावर भाजपच्या काळात छापेमारी झाली नाही. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी यांचा सीबीआयने छळ केला, तो काय आमच्या काळात झाला नव्हता. ईडीच्या कारवायांमागे भाजप असल्याचा आरोप करणे म्हणजे केलेल्या कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवे