शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

अर्जुन खोतकरांनी शक्तीप्रदर्शन न करता भरला उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 1:20 AM

अर्जुन खोतकर हे पन्नास हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकी प्रमाणेच महायुतीचा दबदबा जालना विधानसभा मतदारसंघात कायम राहणार असून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे पन्नास हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे बोलताना व्यक्त केलाजालना विधानसभा मतदार संघातील शिवसेना, भाजपा, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने खोतकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.खोतकर पती-पत्नी कोट्यधीशजालना : जालना विधानसभा मतदार संघातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करतांना निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात संपत्तीचे विवरण जोडले आहे. त्यातील माहितीनुसार खोतकर पती-पत्नी कोट्यधीश असून पत्नी सीमा खोतकर यांनी पती अर्जुन खोतकरांना १५ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. विशेष म्हणजे या विवरणात सीमा खोतकर आणि अभिमन्यू खोतकर यांचे करपात्र उत्पन्न नसून ते शेतीतून आलेले उत्पन्न असल्याचे मानले जाते.जालना विधानसभा मतदार संघातून खोतकर यांनी कुठलाही बडेजाव न करता मुहूर्त साधत मंगळवारी उमेदवारी अर्ज जालना येथील तहसील कार्यालयात सादर केला. यावेळी शपथपत्रामध्ये दिलेल्या माहितीत अर्जुन खोतकरांकडे ३१ लाख १४ हजार रुपये रोख, पत्नीकडे ५० हजार, मुलगा अभिमन्यू खोतकरकडे ७ हजार रुपये रोख असल्याचे नमूद केले आहे. सीमा खोतकरांनी अर्जुन खोतकरांना १५ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. अर्जुन खोतकर यांच्या नावे सावरगाव येथे ७.५ एकर शेतजमीनअसून त्यातून १७ लाख ५६ हजार रुपयाचे उत्पन्न दर्शविण्यात आले आहे. अर्जुन खोतकरांचा मुंबई येथे फ्लॅट असून ज्याचे बाजारमूल्य १ कोटी ७८ लाख रुपये आहे.खोतकरांकडे २० ग्रॅम सोने असून ज्याची किंमत ७८ हजार रुपये आहे. तर त्यांच्या पत्नी सीमा खोतकरांकडे ७०० ग्रॅम सोने असून ज्याची किंमत २७ लाख ३२ हजार रुपये एवढी आहे. अभिमन्यू खोतकरकडे ५० ग्रॅम सोने असून ज्याची किंमत १ लाख ९५ हजार रुपये होते.एकूणच खोतकरांनी जे शपथपत्र दिले आहे. त्यात गुन्हे दाखल नसल्याचे म्हटले आहे. या शपथपत्रातून खोतकरांचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत हा शेती आणि शेतीसमकक्ष व्यवसाय हेच असल्याचे दिसून येते.वारसा हक्काने अर्जुन खोतकरांकडे मिळालेल्या संपत्तीचे बाजारमूल्य ६२ लाख रुपये आहे तर सीमा खोतकर यांच्या स्वसंपादित केलेल्या संपत्तीची किंमत १ कोटी ७३ लाख रुपये आहे. एकूण करपात्र उत्पन्न हे १९ लाख रुपये आहे. २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात खोतकरांचे उत्पन्न १९ लाख ६५ हजार रुपये होते. ते २०१८-१९ मध्ये २७ लाख ४४ हजार रुपये झाले आहे. ज्याची वाढ १४० टक्क्यांमध्ये गणली जाते.अर्जुन खोतकरांवर १ कोटी ७ लाख रुपयांचे कर्ज असून शासकीय देणी ही २५ हजार रुपयांची आहेत. मुंबई येथील एसबीआय बँकेत १२ लाख ९२ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. विशेष म्हणजे खोतकरांनी या शपथ पत्रात कुठलेही स्वमालकीचे वाहन असल्याचे दर्शविलेले नाही.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक