शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का?; जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 19:55 IST

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा नेते प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिले.

 Manoj Jarange Patil ( Marathi News ) : "जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण  संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही", असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी एका कार्यक्रमात केले. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. भाजपा नेते प्रसाद लाड म्हणाले, मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना आरक्षणाबाबत विचारणार आहे का? महाविकास आघाडीचा बुरखा फाडणार आहात का? की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा बुरखा घालून राहुल गांधींची साथ देणार आहात, अशी टीका केली. दरम्यान, आता या टीकेली मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.    "आम्ही राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का? ते आमचे काम नाही, कुणाला काय कराचे, हे त्यांचे राजकीय स्टेटमेंट आहेत. त्याला आम्ही नाही बोलणार, आम्ही फक्त आरक्षणावर बोलणार.बाकीच्या गोष्टी आम्हाला सांगायच्या नाहीत. प्रसाद लाड यांच्यासारखी लोक देवेंद्र फडणवीस यांना वाचविणारी लोक आहेत. जात वाचविणारी लोक नाहीत, असा टोलाही मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. 

भ्रष्टाचार की महागाई म्हणावे...! ७ वर्षांपूर्वी ४२ कोटींना उड्डाणपूल बांधला, आता तोडायला ५२ कोटी खर्च

भाजपा आमदार राजेंद्र राऊत यांनी आज बार्शीत आंदोलन केले. या आंदोलनावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ते आंदोलन करुदेत, काय होतंय. ते चांगले काम करीत आहेत. एकदाच विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे. त्याशिवाय कोणता आमदार मराठ्यांच्या बाजूने बोलतो हे कळणार नाही. विरोधी पक्षाचे आमदार काय म्हणत आहेत. सत्ताधारी आमदार काय म्हणतात हे तर कळेल, असंही जरांगे पाटील म्हणाले. यावेळी पत्रकारांनी जरांगे पाटील यांनी तुमचीही विशेष अधिवेशनाची मागणी आहे का? असा सवाल केला. यावेळी पाटील म्हणाले, ती व्यक्तीही फडणवीस यांच्या सैन्यातील आहे. त्यामुळे ते काहीही मागणी करु शकतात. सत्ता टीकवण्यासाठी आणि पद टीकवण्यासाठी ते काहीही करु शकतात. शेवटी फडणवीस सांगतात तसेच त्यांना करावे लागणार आहे, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

मंत्र्यांना मोठं केले तेच आमदार आता समाजाविरोधात बोलत आहेत

"या लोकांचा दोष नाही, हे सगळं फडणवीस घडवून आणत आहेत. फडणवीस यांना कळत नाही की आपण किती संपवत आहे. जेवढी आमदार, मंत्री बोलतील तितका समाज त्यांच्यावर चिडेल. त्यांच्या पक्षातील मराठा समाजातही आता खदखद निर्माण झाली आहे. आपण मंत्र्यांना मोठं केले तेच आमदार आता समाजाविरोधात बोलत आहेत, असं त्यांना वाटेल, असंही पाटील म्हणाले. हे नेते स्वत:च पक्ष आणि संपत्ती वाचवण्यासाठी समाजाच्या विरोधात गेले आहेत. आमच्यासाठी कोणताही नेता मोठा नाही, आमच्यासाठी आरक्षण मोठं आहे. मराठ्यांना यांच्या तोंडून हे ऐकायचे होते. आरक्षणामुळे आमच्या समाजाचा फायदा होणार आहे, या नेत्यांना आता फडणवीस यांनी कामे दिली आहेत. यांना आता झोपू देणार नाहीत, संपत्ती वाचवण्यासाठी काहीही करतील. फडणवीस सत्तेचा गैरवापर करुन काम करत आहेत. आमचे ऐक नाहीतर तुला तुरुंगात टाकण्याची भिती घालतात, मलाही एसआयटी स्थापन करुन अशीच भिती घातलेली, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

'आरक्षण द्यावे लागणार'

"तुम्हाला आता आरक्षण द्यावेच लागणार आहे. त्याशिवाय मराठा मागे हटत नाही. आमचेच लोक आमच्याविरोधात घालून देवेंद्र फडणवीस फसत आहेत. तुम्ही आरक्षण द्या, तुम्ही आरक्षण न देता खड्डा भरुन काढू शकत नाही, तुम्हाला आरक्षण द्यावेच लागणार आहे, असंही पाटील म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणPrasad Ladप्रसाद लाडBJPभाजपा