शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

२५७ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 01:06 IST

लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा आदर राखत त्यांना विश्वासात घेऊन विकास कामे अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा वार्षिक समितीच्या बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पदाधिकारी व अधिकारी ही रथाची दोन चाके आहेत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठीसकारात्मक दृष्टिकोन ठेवूनपदाधिकारी व अधिकाऱ्यांनी एकसंघपणे काम करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा आदर राखत त्यांना विश्वासात घेऊन विकास कामे अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा वार्षिक समितीच्या बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार नारायण कुचे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार अंबादास दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी  निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकांमुळे चालू वित्तीय वर्षामध्ये मंजूर निधीच्या केवळ ६० टक्केच निधी यंत्रणांना वितरित करण्यात आला होता. उर्वरित ४० टक्के निधी येत्या आठ दिवसांच्या आत वितरित करण्यात येणार आहे. निधी खर्च करण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून यंत्रणांना वितरित करण्यात आलेला निधी पूर्ण कसा खर्च होईल, याची दक्षता घेण्यात यावी. प्राप्त निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करण्यात यावा, निधीचा अपव्यय होणार नाही याचीही काळजी यंत्रणांनी घ्यावी.या बैठकीत २०२० च्या २५७ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत १८१ कोटी १३ लाख रुपये, जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत ७३ कोटी ९६ लाख आणि जिल्हा वार्षिक योजना (ओटीएसपी) अंतर्गत दोन कोटी २५ लाख ९१ हजार रुपये अशा वित्तीय तरतुदीचा आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये कृषी, पशुसंवर्धन, वने व सहकार आदींसाठी २८ कोटी ९१ लक्ष, ग्रामविकास- १० कोटी, लघुपाटबंधारे व कोल्हापुरी बंधारे-१२ कोटी ५० लक्ष, विद्युत-१० कोटी, रस्ते विकास-२८ कोटी ५५ लक्ष, आरोग्य- ३३ कोटी ७८ लक्ष, नगरपालिका व नगरविकास-११ कोटी ७६ लक्ष, अंगणवाडी बांधकाम- ६ कोटी तर शासकीय ईमारतींसाठी ७ कोटी ३६ लाख रुपये आदी कामांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.तरतूद : शाळांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधीजालना जिल्ह्यामध्ये शाळाखोल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. शाळाखोल्यांच्या बांधकामासाठी तसेच दुरुस्त्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून शिक्षण विभागाला निधी देण्यात येतो; परंतु हा निधी या कामासाठी पुरेसा नसल्याने जिल्ह्यातील शाळाखोल्यांसाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करुन अधिकचा निधी कसा प्राप्त करुन घेता येईल, यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी विजेचे जाळे वाढविण्यासह नवीन ट्रान्सफार्मरसाठी निधी खेचून आणणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. रिक्त पदे भरण्यासाठीदेखील आम्ही आग्रही राहणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेJalna z pजालना जिल्हा परिषदMLAआमदारfundsनिधी