शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

अंतरवाली सराटी सरकारच्या जवळच गाव, म्हणून येथे उपोषण करतोय; ओबीसी आंदोलकांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 14:48 IST

इथला आवाज सरकारपर्यंत लवकर जातो; ओबीसी आंदोलकांच्या बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस 

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : सरकारला अंतरवाली सराटी जवळच गाव वाटतं, सरकारच्या पायघड्या येथे लवकर पोहोचतात म्हणून आम्ही येथे येऊन उपोषण करीत आहोत. येथून निघालेला आवाज लवकर सरकारला ऐकू जातो असा टोला ओबीसी आंदोलक ॲड मंगेश ससाणे यांनी लगावला. त्यांनी आज दुपारी माध्यमांशी संवाद साधला.

अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे हे पाच सहकाऱ्या सोबत बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करु नये हैदराबाद गॅझेटसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करू नये या सह इतर मागण्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे.

सरकारला सोयीचे व्हाव म्हणून येथे उपोषणदरम्यान, मराठा आरक्षणाचे नेते मनोज पाटील यांचे आंदोलन येथे सुरू असताना ओबीसी आंदोलकांनी हीच जागा का निवडली अशी टीका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलक मंगेश ससाणे म्हणाले की, अंतरवाली सराटीतून उठलेला आवाज सरकारपर्यंत लवकर पोहतो. सरकारला सोयीचं व्हावं यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. अंतरवाली सराटीच्या रस्त्यावर आमचे दोन उपोषण आहेत. सरकार आमच्याकडे ही येईल आमच्या व्यथा जाणून घेईल. मी कायद्याची लढाई लढणारा आहे. आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या फ्रंटवर ओबीसीची लढाई लढतोय. ही लढाई लढली पाहिजे, असे आवाहनही ससाणे यांनी केले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण