शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अंतरवाली सराटी बनलेय राजकीय आखाड्याचे केंद्रबिंदू; मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मध्यरात्री येताहेत राजकीय नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:19 IST

लोकसभा निवडणुकीत ‘जरांगे फॅक्टर’ महत्त्वाचा ठरला. मराठवाड्यात सात जागांवर महायुतीचा पराभव झाला. याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांचे पाय अंतरवाली सराटीकडे वळत आहेत.

पवन पवार -

वडीगोद्री (जि.जालना) : विधानसभा निवडणूक जाहीर होताच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राजकीय नेते आणि इच्छुकांची रांग लागली असून सरकारमधील मंत्री मध्यरात्री भेटी घेत असल्याने या भेटीमागील गूढ काय, याची उत्सुकता लागून आहे.

 लोकसभा निवडणुकीत ‘जरांगे फॅक्टर’ महत्त्वाचा ठरला. मराठवाड्यात सात जागांवर महायुतीचा पराभव झाला. याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांचे पाय अंतरवाली सराटीकडे वळत आहेत. गेल्या १४ महिन्यापासून जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी लढा देत आहे. त्यांनी ६ उपोषणे केली. अखंड मराठा समाज त्यांच्या बाजूने एकवटला आहे. त्याची प्रचिती नारायण गडावरील दसरा मेळाव्यात आली.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्याने नेतेमंडळींविषयी मराठा समाजात मोठा रोष आहे. यामुळे जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी राजकीय नेतेमंडळी दिवसाची गर्दी आणि मीडियाला टाळून मध्यरात्री जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत.

दरम्यान, जरांगे पाटील यांनी गुरुवारी दिवसभरात समाजाकडून उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेल्या १८०० वर इच्छुकांशी चर्चा केली. यात काही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याचा, तर काहींनी सत्ताधाऱ्यांना पाडण्याचा आग्रह धरला. अंतिम निर्णय २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत घेऊ, असे  जरांगे पाटील यांनी सांगितले. 

चार दिवसांत या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेटआचारसंहिता लागल्यानंतर अंतरवाली सराटी येथे मध्यरात्री येऊन अनेक राजकीय नेते मंडळींनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यात मंत्री उदय सामंत, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राजेश टोपे यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024