शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

मराठवाड्यात दुसरी शाखा स्थापनेत अग्रेसर शिवसैनिक जाणार शिंदे गटात; दसरा मेळाव्यात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 17:34 IST

शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब पाऊलबुद्धे दसऱ्याला करणार सीमोल्लंघन 

अंबड (जालना) : शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब पाऊलबुद्धे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पंडित भुतेकर, भाऊसाहेब घुगे यांच्या नेतृत्वाखाली ते प्रवेश करणार असल्याची माहिती पाऊलबुद्धे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेमध्ये अधिकारशाही वाढली. सामान्य शिवसैनिक आणि माणसाचे दुःख जाणून घेणारे पक्षनेतृत्व आता राहिले नसल्याने आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा त्याग करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसमावेशक नेतृत्व असून, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांच्या कृतीतून दिसून येतात. त्यामुळेच आपण शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे स्पष्ट केले. 

मराठवाड्यातील सेनेची दुसरी शाखा अंबड येथे स्थापन झाली तेव्हापासून गावोगावी शिवसेनेच्या शाखा उघडण्यात पाऊलबुद्धे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी सतरा वर्षे तालुकाप्रमुखपद व सात वर्षे उपजिल्हाप्रमुखपद जबाबदारीने सांभाळले. संकटकाळात त्यांनी धडाडीने पक्षकार्य केले. १९९० साली शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात थोड्या फरकाने पराभव पत्करावा लागला. पराभवाने खचून न जाता पुढे त्यांनी पक्षकार्य सुरूच ठेवले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले. शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा कसा होईल, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले. विभागीय कापूस पणन महासंघाचे संचालकपदही त्यांनी भूषवले आहे.

टॅग्स :JalanaजालनाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे