शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त महिलांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:59 IST

ग्रामपंचायत कार्यालयाने वेळेच्या आधीच महिलांच्या धसक्याने घाईगडबडीत ग्रामसभा आटोपती घेतली. यामुळे संतप्त झालेल्या दीडशे महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला शनिवारी टाळे ठोकले

लोकमत न्यूज नेटवर्कआंबा : येथील ग्रामपंचायत कार्यालयाने वेळेच्या आधीच महिलांच्या धसक्याने घाईगडबडीत ग्रामसभा आटोपती घेतली. यामुळे संतप्त झालेल्या दीडशे महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला शनिवारी टाळे ठोकले. ग्रामसभेत सहभागी होऊ न देणे हा तर आमच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली जात आहे. असा आरोप करत महिलांनी दोन तास ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. परतूर तालुक्यातील सर्वात मोठी आंबा ग्रामपंचायत आहे.ग्रामपंचायत कार्यालयाने शुक्रवारी गावामध्ये दवंडी देऊन शनिवारी सकाळी ९ ते १० या वेळेत ग्रामसभा होणार असून यात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्यामुळे शासन दरबारी विविध मागण्या मांडण्यासाठी १०० ते १५० महिलांनी ९ : १५ वाजता ग्रामपंचायत कार्यालय गाठले, यावेळी ग्रामसभा संपली असल्याचे ग्रामविकास अधिकारी नामदेव काळे यांनी त्यांना सांगितले.यानंतर विविध मागण्यांवर चर्चा करण्याआधीच ग्रामसभा कशी संपली. असा सवाल महिलांनी उपस्थित केला असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली, असा आरोप गावातील लता काळदाते यांनी केला आहे.याबाबत ग्रामविकास अधिकारी नामदेव काळे म्हणाले, सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी ग्रामसभेला सुरूवात झाली, सर्व विषय चर्चिल्यानंतर १०.१५ वाजता ही ग्रामसभा संपली. यानंतर सर्वांची संमती घेऊन सरपंच घरी गेल्यावर मी परतूरला आलो. असे ते म्हणाले.ग्रामसभेला आम्ही येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी, सरपंचांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक ग्रामसभा आटोपती घेतली. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.

टॅग्स :Womenमहिलाgram panchayatग्राम पंचायतagitationआंदोलन