शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अन् विद्यार्थी लैंगिक शिक्षणावर बोलू लागले; जालन्यातील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

By महेश गायकवाड  | Updated: August 6, 2022 18:47 IST

किशोरवयीन मुला-मुलींमध्ये वयोमानानुसार होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलाविषयी त्यांना वेळीच माहिती देणे आवश्यक बनले आहे.

जालना: शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक विकासासाठी लैंगिक शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. परंतु, लैंगिक शिक्षणावर बोलायचे कसं, आपल्या मुलांशी त्यावर बोलण्यासाठी पालकांचीच मानसिक तयारी होत नाही. म्हणून इंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा चाटुफळे यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी महिन्यातून एक दिवस शारीरिक व मानसिक विकास या विषयावर विशेष वर्ग भरवत आहे. त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे शाळेतील मुले-मुली आता लैंगिक समस्या आणि प्रश्नांवर मनमोकळ्यापणाने शिक्षकांशी बोलू लागली आहे.

किशोरवयीन मुला-मुलींमध्ये वयोमानानुसार होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलाविषयी त्यांना वेळीच माहिती देणे आवश्यक बनले आहे. परंतु, याकडे समाज नकारात्मकदृष्टीने बघत आलेला आहे. त्यामुळे किशोर वयात मुलींच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे त्यांच्या नैराश्य आणि न्यूनगंड तयार होतात. यावर वेळीच मार्गदर्शन करण्यासाठी मुख्याध्यापिका वर्षा चाटुफळे दर महिन्याला विशेष वर्गाचे आयोजन करून शारीरिक व मानसिक बदलांवर विद्यार्थ्यांशी मनमोकळ्यापद्धतीने संवादातून मार्गदर्शन करत आहे. या विशेष वर्गात लैंगिक शिक्षण, मासिक पाळी, ताण तणावाचे व्यवस्थापन आदी विषयावर मुलामुलींना मुख्याध्यापिका चाटुफळे मार्गदर्शन करतात. मासिक पाळी सुरू झालेल्या मुलींना त्या स्वखर्चातून सॅनिटरी पॅडही वाटप करत आहेत. शाळेतील विशेष वर्गात विद्यार्थी आपल्या मनातील विविध प्रश्न आणि शंका आपल्या शिक्षकांसमोर मांडत असून, शिक्षक सोप्या भाषेत त्याचे निरसन करत आहेत. या उपक्रमामुळे भविष्यात विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या प्रश्न आणि समस्यांची जाणीव त्यांनी आधीच होत असल्याने त्यांच्यातील भीती दूर होण्याास मदत होत आहे. शाळेतील मुली शिक्षिकांसोबत मासिक पाळीबाबत मनमोकळ्या पद्धतीने बोलत आहेत.

जनजागृती होणे गरजेचेलैंगिक शिक्षणात केवळ शरीराच्या भागाची माहिती देऊन जागृती होत नाही. वयानुसार शरीरिक आणि भावनिक बदल होत असतात. मुलांना त्यांच्याशी जुळवून घ्यायला शिकवण्याचा प्रयत्न मी करत आहे. सध्याच्या युगात मुलांमधील भावभावनांच्या आंदोलनांना ओळखून वेळीच त्या संयमित करायला शिकवणे गरजेचे आहे. समाजात मासिक पाळीबाबत चुकीच्या प्रथा पाळल्या जातात. त्याबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे.- वर्षा चाटुफळे, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा इंदेवाडी

टॅग्स :Educationशिक्षणJalanaजालना