शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ही सिस्टीम ‘ब्रेक’करण्याचा प्रयत्न उघड

By अमित महाबळ | Updated: October 1, 2022 16:37 IST

Jalgaon: बुधवारी, तपासणीवेळी दिव्यांग असल्याचे भासविणारे पाच जण सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई झालेली नसली, तरी मंडळाचे प्रशासन अधिक सावध झाले आहे.

- अमित महाबळजळगाव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळाची कार्यप्रणाली मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून टोकनवर संशयास्पदरितीने केलेली खाडाखोड, कर्मचाऱ्यांना आमिषे दाखविणे यासारख्या घटना उघड होत असतानाच बुधवारी, तपासणीवेळी दिव्यांग असल्याचे भासविणारे पाच जण सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई झालेली नसली, तरी मंडळाचे प्रशासन अधिक सावध झाले आहे.

कोविडसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिग्रहित करण्यात आले होते. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या शेवटी ते नॉन कोविड करण्यात आल्यानंतर २८ जुलैपासून दिव्यांग मंडळाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. मात्र, तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांगांची एकाच दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी ४ ऑगस्टपासून कूपन प्रणाली सुरू करण्यात आली. यामुळे एजंटांना चाप बसला. त्यांनी उभी केलेली समांतर व्यवस्था मोडीत निघाली. गैरव्यवहार थांबले. या दरम्यान कूपन प्रणाली बंद करा म्हणून काही संघटनांनी प्रयत्न देखील केले होते. त्याला प्रशासनाने दाद दिली नाही.

प्रयत्न हाणून पाडलेकूपनवर दिव्यांग व्यक्तीचे नाव व इतर माहिती लिहिलेली असते. त्यामध्ये खाडाखोड केली असल्याचे यापूर्वी आढळून आले होते. तसेच कर्मचाऱ्यांना आमिषे दाखविण्याचे प्रकार घडले होते. मात्र, बुधवारच्या तपासणीवेळी धक्कादायक प्रकार उघड झाला. पाच व्यक्तींनी दिव्यांग असल्याचा बनाव केला होता. वैद्यकीय तपासणीवेळी ही बाब समोर आली.

अर्ज ऑनलाइन, त्याचा घेतला जातो गैरफायदातपासणीसाठी अर्ज ऑनलाइन करायचा असतो. या संकेतस्थळावर नियंत्रण सरकारचे आहे. दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याची कार्यवाही दिव्यांग मंडळ करते. याचाही गैरफायदा काही जण घेत आहेत. याआधी एक व्यक्ती दिव्यांग असल्याचे भासवत दिव्यांग मंडळात आली होती. या व्यक्तीने चालण्यासाठी कुबड्यांचा आधार घेतला होता मात्र, घाईगडबडीत परत जाताना चक्क कुबड्या विसरून गेली होती.

अज्ञानातून लाभ घेण्याचा प्रयत्नकाही प्रकरणे अशीही समोर आली आहेत, की सरकारी योजनेचा लाभ मिळेल म्हणून किरकोळ दुखापतींमुळे दिव्यांगत्व आले आहे, असे दाखण्याचे प्रयत्न अज्ञानातून करण्यात आले होते. चुकीचे सल्ले देणाऱ्या व्यक्तींमुळे अशा घटना घडत आहेत. वैद्यकीय तपासणीत या गोष्टींना चाप बसतो.

दिव्यांग मंडळाच्या अध्यक्षांचे आवाहनएजंट किंवा अन्य एखादी व्यक्ती पैसे घेऊन दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवत असेल, तसेच काही गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास दिव्यांग मंडळात किंवा अधिष्ठाता कार्यालयात संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव