शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जालन्यात आंबेडकरांचा जयघोष...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:36 IST

भीमा सारखा माणूस खरा जन्मा येईल काय... सांगा माझ्या भीमरायावाणी कोणी पुढारी होईल का.. आदी एका पेक्षा एक सरस गाण्यांनी रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत उत्साह संचारला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उध्दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे.., कसा शोभून दिसतोय टाय अन् कोटावर.., सुज्ञानाचा निर्मळ झरा.. भीमा सारखा माणूस खरा जन्मा येईल काय... सांगा माझ्या भीमरायावाणी कोणी पुढारी होईल का.. आदी एका पेक्षा एक सरस गाण्यांनी रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत उत्साह संचारला होता.रविवारी सकाळपासूनच मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आंबेडकरप्रेमी जनतेने मोठी गर्दी केली होती. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल तसेच शेख महेमूद, रमेश देहडकर, मधुकर घेवंदे, दिनकर घेवंदे, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अ‍ॅड. बी.एम.साळवे, संजय खोतकर, सुधाकर निकाळजे, अ‍ॅड. शिवाजी आदमाने, पिंटू रत्नपारखे, सुनील साळवे, अरूण मगरे, राजेंद्र जाधव, राहुल रत्नपारखे, संदीप खरात, योगेश रत्नपारखे व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.सकाळी परिसरात निळे झेंडे आणि ढोलताशांनी परिसरात उत्साही वातावरण होते. अनेकांनी एकमेकांना भेटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नवीन आणि जुना जालना भागातून युवकांनी सकाळपासूनच डीजेच्या तालावर भव्य मिरवणुका काढल्या होत्या. सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत युवकां प्रमाणेच महिला आणि युवतींचा लक्षणीय सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नालंदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. सलग १८ तास अभ्यास करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याची माहिती भास्कर शिंदे यांनी दिली.३० वाहनांचा सहभाग : देखाव्यांनी वेधले लक्षडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मुख्य मिरवणुकीमध्ये ३० पेक्षा अधिक वाहनांचा सहभाग होता. तर शहराच्या विविध भागांतून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे सादर करण्यात आले होते.शहरातील मुथा बिल्डिंग येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या पडद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखविण्यात येत होता. याचेळी विशेष लेझर शो आणि आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून गेला होता. मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.स्वयंसेवी संस्थांची मदतडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना चौका-चौकामध्ये पिण्याचे थंड पाणी तसेच चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक युवकांनी आपल्या मोटार सायकलींना मोठमोठे निळे झेंडे लावून सकाळी मोटारसायकल रॅली काढली होती. मिरवणुकीत लेझीम पथक आणि अन्य सांस्कृतिक देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. वाहतुकीला अडचण येऊ नये म्हणून दुसऱ्या मार्गावर वाहतूक वळविली होती.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocialसामाजिक