शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाचे सर्व प्रश्न सुटतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:59 IST

आरोग्य विभागासंदर्भात असलेले प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोडवतील, असा विश्वास खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा रुग्णालयासह जिल्हा आरोग्य विभागाचे काम चांगले सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू झालेल्या विविध विभागांचा रुग्णांना लाभ मिळणार असून, आरोग्य विभागासंदर्भात असलेले प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोडवतील, असा विश्वास खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हा आरोग्य विभागाची विशेष बैठक घेऊन चर्चा करण्यासंदर्भातही त्यांनी सूचना दिल्या.जिल्हा रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या केमोथेरपी युनिट, नवीन सी. टी. स्कॅन यंत्रणा, डीईआयसी, सोलार सिस्टीम, विभागीय कौशल्य प्रशिक्षण केंद्र, औषधी भांडार, परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन खा. सुप्रिया सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास आ. कैलास गोरंट्याल, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहायक उपसंचालक डॉ. भटकळ, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निमा आरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुळे यांनी आपल्या धावत्या दौऱ्यात उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.जालना जिल्हा रूग्णालयासह आरोग्य विभागाचे काम चांगले सुरू आहे. या रुग्णालयात सुरू झालेल्या विविध विभागांमुळे रुग्णांना चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे हे काम पाहत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचा-यांची एक स्वतंत्र बैठक लावावी, त्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत, बैठकीला आपल्यालाही निमंत्रीत करावे, अशा सूचनाही खा. सुळे यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, उपस्थित मान्यवरांचे रुग्णालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.महिला कर्मचा-यांसमवेत काढले सेल्फीखा. सुप्रिया सुळे यांचे जिल्हा रुग्णालयात आगमन झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, यावेळी दूर उभ्या असलेल्या परिचारिकांसमवेत आणि कार्यक्रमास उपस्थित आशा कार्यकर्ती, महिलांसमवेत स्वत: खा. सुळे यांनी सेल्फी काढून घेतले. तसेच महिलांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. हा प्रसंग परिचारिकांसह आशा कार्यकर्तींसाठी सुखद धक्का होता.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेRajesh Topeराजेश टोपेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल