शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मेहनत अन् नियोजनातून भावंडांची किमया, ३ एकर मिरचीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

By शिवाजी कदम | Updated: August 4, 2023 19:03 IST

नोकरीच्या मागे न पळता या युवकांनी आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित जमीन कसण्यास सुरुवात केली.

- गणेश पंडितकेदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथील तरुण शेतकरी समाधान गाढे व अमोल गाढे या भावांनी तीन एकर शेतीमध्ये विविध जातींची मिरची लागवड केली आहे. त्यातून त्यांना साडेसात लाखांचे भरघोस उत्पादन मिळाले आहे. खर्च वजा करता सहा लाखांचा निव्वळ नफा त्यांना प्राप्त झाला आहे. आणखी दोन ते तीन लाखांच्या उत्पन्नाची त्यांना अपेक्षा आहे.

शेती हा नफ्याचा व्यवसाय नाही, ही संकल्पना मोडीत काढत बरंजळा साबळे येथील गाढे बंधूंनी शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. नोकरीच्या मागे न पळता या युवकांनी आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित जमीन कसण्यास सुरुवात केली. जिद्द मेहनतीची जोड देऊन मिरचीचे उत्पादन घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी तीन एकर शेतीत शिमलासह विविध प्रकारच्या मिरचीची लागवड केली. त्यातून त्यांना भरघोस उत्पादन मिळत आहे. 

समाधान गाढे यांनी पुणे विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. तसेच अमोल गाढे यांनी देखील पदवीधर आहेत. शिक्षण घेत असतानाच त्यांनी शेतीची कास धरून मिरची उत्पादन घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. पिकांचे व्यवस्थित, निगा व योग्य नियोजन केल्याने चांगल्या उत्पन्नाची हमी मिळते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. सध्या त्यांनी मिरची तोडणीला सुरुवात केली असून, चार ते साडेचार हजारांचा भाव मिळत आहे. त्यांना साडेसात लाखांचे उत्पादन मिळाले असून, एक लाख पन्नास हजार रुपये खर्च लागलेला आहे. मिरची उत्पन्नातून गाढे बंधूंना सहा लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे.

मेहनत केल्यास यश नक्कीयुवकांना शेती करण्यात रस राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती तोट्यात असल्याचे सांगण्यात येते. नुकसान झाल्यास सरकारी मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, पिकांच्या योग्य नियोजनासह मेहनत केल्यास यश नक्कीच मिळते, हे गाढे बंधूंनी सिद्ध करून दाखवले आहे.

योग्य नियोजन आवश्यकआम्ही दोन्ही भाऊ वडिलोपार्जित शेती जिद्द व मेहनतीच्या जोरावर कसत आहोत. शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीच्या मागे न लागता नियोजनबद्ध शेती केल्याने चांगले उत्पन्न मिळत आहे. शेतीमध्ये मेहनत करण्याची तयारी असेल तर उत्पन्नाची हमी असतेच. तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज असल्याचे समाधान गाढे व अमोल गाढे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना