शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

ग्रामसेवकांचे जालना जिल्ह्यात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:27 IST

ग्रासेवक, ग्रामसेविका पद रद्द करून केवळ पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करावी, यासह इतर विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमागण्या प्रलंबीत : ग्रामसेवकांअभावी गावगाडा झाला ठप्प; पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करण्यासह इतर मागण्या

जालना : ग्रासेवक, ग्रामसेविका पद रद्द करून केवळ पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करावी, यासह इतर विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामसेवकांच्या या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीतील अनेक कामे ठप्प झाली होती.ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बदल करून पदवीधर ग्रामसेवक नियुक्त करावेत, सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी साजे व पद वाढवावेत, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर करावी, सन २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी, आदर्श ग्रामसेवक राज्य, जिल्हास्तर, आगाऊ वेतनवाढ करून एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करावी, ग्रामसेवकाकडील अतिरिक्त कामे कमी करावीत आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आॅगस्ट क्रांतीदिनी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास १३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन, निदर्शने करण्यात येतील.तसेच पुढील कालावधीत विविध मार्गांनी आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.अंबड येथेही आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष व्ही.एम.राठोड, सचिव शेख सालार शे. हुसेन, महिला उपाध्यक्षा जी.आर. वल्ले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.जाफराबादमध्ये आंदोलनजाफराबाद : तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने आपल्या न्याय मागण्यांसाठी येथील पंचायत समिती कार्यलयासमोर शुक्रवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत यांना निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेचे एस. डी. शेळके, व्ही. व्ही. जयभाये, एल. एन. धुमाळ, ई. डी. काळे, पी. पी.पडघन, ए. ए. डोईफोडे, आर. बी. जाधव, डी. के. मेहत्रे, आर. एम. कंकाळ, व्ही. पी. बाहेकर, एम. आर. डोईफोडे, एन. एल. चौधरी, व्ही. पी. बोबडे, व्ही. आर. देशमुख, जे.यू. आढाव, ए. ए. शेख, एस. पी. लोखंडे आदी उपस्थित होते.परतूर : मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनपरतूर : ग्रामसेवक संघटनेच्या वतीने शुक्रवारी विविध मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.यावेळी तालुकाध्यक्षबाबासाहेब चव्हाण, डी. बी. काळे, एस. के. शेख, ई. टी. मुरदकर, पठाण, एस. एम. माने, नामदेव काळे, ए.बी. मेहत्रे, व्ही. एस. वानखेडे, ई.यू. दडमल, एम.आर. काकडे, पी.एस. ठोंबरे, सुप्रीया उपरवाड, सुवर्णा चाटे, गंगासागर गायकवाड, सारीका बसवदे, अर्चना राउत, आम्रपाली घागरमाळे, बि. एस. राउत, व्ही. जी. पिंपळे, एस. एम. अंभोरे, यु.एस. अंभूरे, ए. बी.सोळंके, पी. एस. ठोंबरे, बि. एन. बरकु ले यांच्यासह ग्रामसेवक उपस्थित होते.

टॅग्स :Jalanaजालनाpanchayat samitiपंचायत समितीEmployeeकर्मचारीagitationआंदोलन