शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रोहनवाडीनंतर आता सारवाडीत जलसंधारणाचा यज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:44 IST

जलसंधारणा सोबतच व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियानही येथे यशस्वीपणे राबविण्याची शपथ गावकऱ्यांनी यज्ञ सोहळ्यात घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील अरूणिमा फाऊंडेशने जालना तालुक्यातील रोहनवाडीत तीन वर्षे लोकसहभाग घेऊन जल क्रांती केली आहे. आता हीच लोकचळवळ रोहनवाडीच्या शेजारील सारवाडी गावात होणार असून, त्याचा श्रीगणेशा रविवारी २४ कुंडी गायत्री यज्ञाने झाला आहे. जलसंधारणा सोबतच व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियानही येथे यशस्वीपणे राबविण्याची शपथ गावकऱ्यांनी यज्ञ सोहळ्यात घेतली.अरूणिमा फाऊंडेशनचे संचालक रघुनंदन लाहोटी, कविता लाहोटी यांनी पुढाकार घेऊन रविवारी विरेश्वर उपाध्याय महाराज - हरिव्दार यांच्या प्रमुख उपस्थितीत सारवाडीत २४ कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करून केली. सकाळी ८ वाजेपासूनच गावातील बहुतांश सर्व ग्रामस्थ या यज्ञ सोहळ्यात सपत्नीक सहभागी झाले होते. यज्ञ म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून, या यज्ञ सोहळ्यातून आपण आपल्या जीवनात कसे परिवर्तन आणू शकतो आणि यज्ञाच्या माध्यमातून केवळ यज्ञात आहुती टाकून मंत्रोच्चार करणे याला तर महत्त्व आहेच, परंतु हा यज्ञ करताना त्यांची सांगता ही चांगल्या कामांचा प्रारंभ करून ते यशस्वी करण्यासही यज्ञ असे संबोधले जाते असे स्पष्टीकरण विरेश्वर महाराजांनी एकेका श्लोकातून समजावून सांगितले.विश्वकल्याण आणि विश्वशांती तसेच जगातील सर्व मानवजातीचे कल्याण आणि उथ्थाला यज्ञातून प्राधान्य दिले जाते. वाईट बाबींचा त्याग करून नवीन आणि मानव कल्याणाच्या बाबींचा संकल्प म्हणजे यज्ञ असतो असेही यावेळी सांगण्यात आले.सकाळी ८ वाजेपासूनच सारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर २४ कुंड तयार करण्यात आले होते. गावातील प्रत्येक घरा समोर सडा-रांगोळी काढून स्वच्छतेला महत्व देऊन गावातील वातावरण प्रसन्न करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी शाळेतील मुले-मुली देखील यज्ञ सोहळ्यात हिरीरीने सहभागी झाल्याचे दिसून आले.विरेश्वर महाराज संस्कृतमधून यज्ञा संदर्भातील मंत्रोच्चार करत असताना कविता लाहोटी या त्याचे मराठीतून महत्त्व समजावून सांगत होत्या. त्यामुळे गावकºयांना आपण यज्ञ का करतो, हे समजण्यास मोठी मदत झाली.जलसंधारणासोबतच शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, महिलांचे सक्षमीकरणावरही यावेळी भर देण्यात येणार आहे. यावेळी प्रोफेसर काबरा, नम्रता काबरा, डॉ. महेंद्र काबरा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.रोहनवाडी येथील ग्रामस्थांनी आमच्या हाकेला सकारात्मक साथ देत गावाचा चेहरामोहरा बदला असून, तेथील ग्रामस्थांनी सेंद्रिय शेती, गोपालन करून स्वत:सह गावाचा विकास साधला आहे. त्यामुळे रोहनवाडी शिवारालगच असलेल्या सारवाडी येथेही असाच प्रयोग यशस्वी करण्यासाठी आमच्या फाऊंडेशनकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी रविवारी २४ कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करून प्रथम गावकºयांमध्ये चेतना जागविण्याचे काम केले. पुढील वर्षभरात येथे शास्त्रीयदृष्ट्या जलसंधारणाचे काम हाती घेण्यात येणार असून, भूगर्भातील पाणी पातळीचा अभ्यास करून हे काम हाती घेण्यात येणार आहे.- रघुनंदन लाहोटी,अध्यक्ष, अरूणिमा फाऊंडेशन

टॅग्स :SocialसामाजिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प