शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांनंतरही ६० गावांमध्ये समित्या नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 01:01 IST

अद्यापही ६० गावांमध्ये दारूबंदी समित्या स्थापन करण्यात आल्या नसल्याने या गावांमध्ये अवैध दारू विक्रीबरोबरच तरूण व्यसनाधीन होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : पाच महिन्यांपूर्वी बदनापूर पोलीस ठाण्याअतंर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात दारूबंदी समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांंनी दिले होते. पाच महिन्यानंतरही पोलीस ठाण्यातंर्गत येणाºया ७६ गावांपैकी १६ गावांमध्येच दारूबंदी समित्या स्थापन करण्यात आल्या. अद्यापही ६० गावांमध्ये दारूबंदी समित्या स्थापन करण्यात आल्या नसल्याने या गावांमध्ये अवैध दारू विक्रीबरोबरच तरूण व्यसनाधीन होत आहे.गणेशोत्सव काळात बदनापूर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी पोलीस पाटील व शांतता समिती सदस्यांची बैठक घेतली होती. बैठकीमध्ये अनेक गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध दारू विक्रीचा मुद्दा उपस्थित करून अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती़ उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी पोलीस पाटील व शांतता समितीच्या सदस्यांना आपल्या कर्तव्याची जाणिव करून देत गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी गावपातळीवर येत्या आठ दिवसात दारूबंदी समिती स्थापना करावी, अशा सूचना दिल्या होत्या.समिती स्थापन करण्यासाठी पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, तंटामुक्ती, ग्रापचे पदाधिकारी यांच्यासह अनेकांचा समावेश करण्याचे आदेश दिले होते़ त्यानंतर काही गावांमध्ये समित्या स्थापन झाल्या. परंतु, काही गावांमध्ये अद्यापही समित्या स्थापन नसल्याने अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे़गावात सहज उपलब्ध होणाºया दारूमुळे अनेक तरूणांना दारूचे व्यसन लागले असून या दारूमुळे अनेकांची भांडणे होत आहे. अनेकांना दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे ते आपल्या कुटुंबाचीही पर्वा करत नाही. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत़ लवकरच समित्या स्थापन करू, असे पोलीस निरीक्षक एम. बी. खडेकर यांनी सांगितले.पोलीस पाटलांची अनेक पदे रिक्ततालुक्यात बदनापूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या ७६ गावांपैकी केवळ २२ गावांमध्ये पोलीस पाटलांच्या जागा भरलेल्या आहे. ५४ गावे पोलीस पाटलाविनाच आहे.गावात सुरू असलेले अवैध धंदे, गावातील छोट्या- मोठ्या तक्रारींबाबत पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पोलीस पाटील महत्वाचा दुवा आहे़ परंतु, पोलीस ठाण्यातंर्गत येणाºया अनेक गावांमध्ये पोलीस पाटील नाही. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळणाºया पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीSocialसामाजिक