शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

जामीनावर बाहेर येताच पुन्हा अवैध सोनोग्राफी यंत्र विक्रीत सक्रिय; जालन्यात टोळीच जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:16 IST

जालना पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा सामान्य रुग्णालयाची संयुक्त कारवाई

जालना : गर्भलिंग तपासणी करण्यासाठी आणण्यात आलेली जुनी अवैध सोनाग्राफी मशीन विक्री करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. मशीन खरेदी करण्यासाठी डमी ग्राहक पाठवण्यात आले. बुधवारी मशीन विक्रीसाठी आल्यानंतर आरोपीस ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मशीन विक्री करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश झाल्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या हॉस्पिटल्समध्ये असे यंत्र देण्यात आलेले आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे.

जुनी सोनोग्राफी यंत्र विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांना मिळाली होती. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. सोनाग्राफी यंत्र विकणाऱ्या टोळीच्या शोधासाठी पोलिस आणि जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले. यंत्र विक्री करताना आरोपीस बुधवारी जालना शहरातील कलावती हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आले. अवैध सोनोग्राफी यंत्राची विक्री प्रकरणी संदीप कैलास गाेरे (वय २३, रा. भिलपुरी, ता.जि. जालना), सोमनाथ परसराम बारसे (वय ३०, रा. हनुमाननगर, वाळूज, छत्रपती संभाजीनगर), (योगेश शालिकराव धांडे, वय २२, रा. चाळगेनगर, इंदेवाडी, ता.जि. जालना) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून पाच लाख रुपये किमतीचे गर्भलिंग निदान करणारे सोनोग्राफी यंत्र, एक स्विफ्ट डिझायर कार, एक टीव्हीएस कंपनीची स्कुटी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गर्भधारणापूर्व आणि प्री-नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स (पीसीपीएनडीटी) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनात डाॅ. बेबी सरोज घोलप, ॲड. सोनाली कांबळे, डाॅ. प्रज्ञा कुलकर्णी, डॉ. ज्ञानेश्वर वायाळ, शेख वसीम, शेख हनीफ, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पव्हरे, प्रशांत लोखंडे, सुधीर वाघमारे, योगेश सहाणे, कविता काकस, सत्यभामा काकडे, सौरभ मुळे यांनी केली.

आठ दिवस टोळीच्या संपर्कातपोलिस आणि जिल्हा डॉक्टरांच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून आठ दिवसांपूर्वी सोनोग्राफी यंत्र विकणाऱ्या टोळीशी संपर्क केला होता. टोळीतील मुख्य सूत्रधार आरोपी संदीप गोरे हा डमी ग्राहकास यंत्र विकण्यासाठी संपर्कात होता. अखेर बुधवारी सोनोग्राफी यंत्र देण्यात येईल, असे डमी ग्राहकास सांगण्यात आले. आरोपीकडून डमी ग्राहक यंत्र घेत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत तीन आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपीवर यापूर्वीही गुन्हेटोळीचा मुख्य सूत्रधार संदीप गोरे यांच्यावर २०२२ मध्ये देखील अवैध गर्भलिंग तपासणी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. जालना शहरातील चंदनझिरा व बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिस ठाण्यात देखील संदीप गोरेविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सध्या संदीप गोरे जामिनावर बाहेर आलेला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना