शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

कौतुकास्पद! जालन्यात महिला चालकाच्या हाती रुग्णवाहिकेची स्टेरिंग

By शिवाजी कदम | Published: March 19, 2024 6:44 PM

चूल आणि मूल यावर मर्यादित न राहता रुग्णवाहिका चालकाची कामगिरी देखील सक्षमपणे महिला पार पाडत असल्याचे आता दिसणार आहे.

नेर : जालना तालुक्यातील नेर येथे ग्रामीण रुग्णालयात जिल्ह्यामधील पहिली महिला रुग्णवाहिका चालक म्हणून माधुरी गरुड रुजू झाल्या आहेत. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय वाकोडे यांनी गरुड यांचा सत्कार केला, गरुड यांची रुग्णवाहिका चालक म्हणून नियुक्ती हे महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय वाकोडे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. राठोड, डॉ. चव्हाण यांची उपस्थिती होती.

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धरी’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे. चूल आणि मूल यावर मर्यादित न राहता रुग्णवाहिका चालकाची कामगिरी देखील सक्षमपणे महिला पार पाडत असल्याचे आता दिसणार आहे. एखादी महिला रुग्णवाहिका चालवत आहे हे दृश्य खेड्यापाड्यात नाही, परंतु आता थेट रुग्णवाहिकेचे सारथ्य करताना एक महिला दिसणार आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या सेवेमध्ये महिला चालक रुजू झाल्या असून नुकतेच माधुरी गरुड यांनी रुग्णवाहिका चालवून एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.

चालक पदाची संधीनेर येथे ग्रामीण रुग्णालयात माधुरी गरुड या चालक म्हणून रूजू झाल्या आहेत. यामुळे गर्भवती महिलांसह इतर रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचे काम गरुड या करणार आहेत. जिल्ह्यात प्रथमच एक महिला रुग्णवाहिका चालक म्हणून रुग्णांची सेवा करणार आहेत. चालक पदावर रूजू झाल्यानंतर माधुरी गरुड यांनी महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

या कामात समाधानी आहे कोरोना काळामध्ये झालेले रुग्णांचे हाल पाहावत नव्हते. रुग्णवाहिका किंवा खासगी वाहने रुग्णांना नेण्यासाठी वेळेवर मिळत नव्हते. त्यामुळे डोळ्यादेखत अनेक रुग्ण दगावताना पाहिली. यामुळे मी देखील वैद्यकीय क्षेत्रात येऊन रुग्णसेवा करण्याचा निश्चय केला होता. चालकपदी नियुक्ती झाल्यामुळे मला रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळेल. मला हे काम करताना समाधान वाटत आहे.- माधुरी गरुड, रुग्णवाहिका चालक.

टॅग्स :JalanaजालनाMedicalवैद्यकीय