शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

व्यसनी पित्याने केली पोटच्या मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:14 IST

आपला पोटचा मुलगा चारचौघात आपला अपमान करायचा, तसेच कर्ज चुकवण्यासाठी घर विक्री करण्यास विरोध करायचा यामुळे याचा राग मनात धरुन दारुच्या व्यसनी गेलेले वडील हनुमान कुरधने यांनी मुलगा संतोष याचा (वय २२) झोपेत असतानाच त्याच्यावर लोखंडी गजाने अनेक वार करुन खून केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आपला पोटचा मुलगा चारचौघात आपला अपमान करायचा, तसेच कर्ज चुकवण्यासाठी घर विक्री करण्यास विरोध करायचा यामुळे याचा राग मनात धरुन दारुच्या व्यसनी गेलेले वडील हनुमान कुरधने यांनी मुलगा संतोष याचा (वय २२) झोपेत असतानाच त्याच्यावर लोखंडी गजाने अनेक वार करुन खून केला.ही घटना बुधवारी बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे सकाळी उघडकीस आली होती. घराच्या बाहेर सापडलेल्या दोन दारुच्या बाटल्या आणि चार ते पाच उकडलेल्या हरभऱ्याच्या दाण्यांवरून पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. या प्रकरणी मयताचा पिता हनुमान कुरधने याला चोवीस तासांत अटक केली. आपणच मुलाचा खून केल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली.मूळचे नंदापूर (ता. जालना) येथील रहिवासी असलेले कुरधने कुटुंब १० वर्षांपासून रामखेडा येथे मजुरीसाठी स्थायिक झाले आहे. आई-वडील शेजारील कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याकडे झोपण्यासाठी गेले होते.मंगळवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास हनुमान कुरधने हे झोपेतून उठून आपल्या घरी गेले. खून करण्याआधी त्याने घराच्या वट्यावर सोबत असलेली दारु प्राशन केली. तसेच सोबत आणलेला ‘चकणा’ फस्त केला. दारुची नशा चढल्याने त्याने हिमतीने दरवाजा वाजवून मुलगा संतोष याला आवाज दिला. झोपेत असलेल्या संतोष याने दरवाजा उघडून लगेच अंगावर पांघरूण घेऊन झोपला. हीच संधी साधून आरोपी हनुमंत कुरधने याने घरात ठेवलेला लोखंडी गज काढून झोपेत असलेल्या आपल्या पोटच्या मुलाच्या डोक्यावर सपासप वार केले. मुलगा रक्ताच्या थारोळयात पडताच हनुमंत याने घटनास्थळावरुन पळ काढला शेजारच्या गच्चीवर परत झोपण्यासाठी गेला. इकडे तडफडून मुलगा ठार झाला होता. सकाळी मयत संतोष कुरधने याची बहीण घरी आली असता आपला भाऊ रक्ताच्या थारोळ्यात दिसल्याने तिने टाहो फोडला. आरोपी हनुमान आणि त्याच्या पत्नीने घर गाठले.यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. छोट्याशा गावात खून झाल्याने गावात खळबळ उडाली होती.याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, बदनापूरचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर, एडीएसचे यशवंत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता.एकूणच पोलिसांच्या या झटपट व यशस्वी तपासकार्यामुळे आरोपी जेरबंद झाला आहे.असा झाला खुनाचा उलगडाउपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या पथकाने या खुनाचा छडा लावण्यासाठी बारकाईने तपास केला. घटनास्थळी सापडलेल्या दारुच्या दोन बाटल्या आणि उकडलेल्या हरभ-याचे दाणे यावरुन पोलिसांनी तपास केला.बदनापूर येथील एका देशी दारुच्या दुकानाबाहेरच फक्त उकडलेले हरभरे मिळतात.हाच धागा पकडून पोलिसांनी चणे विकणा-याकडून चौकशी केली असता सदर आरोपी हनुमंत कुरधने याने मंगळवारी रात्री आपल्याकडून उकडलेले चणे खरेदी केल्याची माहिती दिल्यानंतर संतोष कुरधनेचा खून त्याच्या पित्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.जावयासमोर अपमान केला अन्...लहानपणापासून माझ्या मुलाला मोलमजुरी करुन मोठे केले, त्याच्या आजारावर लाखो रुपयांचा खर्च केला. असे असताना त्याने वेळोवेळी गावातील नागरिकांसमोर माझा अपमान केला.अनेकवेळा दारु पिऊन आल्यास मला जेवू देत नसत, माझा जावई घरी आला असताना त्याने जावयासमोर शिवीगाळ करुन मला मारहाण केली होती, असे आरोपीने सांगितले.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी