शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहागड येथील अवैध वाळू तस्करीला खतपाणी घालणाऱ्या मंडळ अधिका-यावर होणार निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 15:56 IST

कारवाईची माहिती देताना भारस्कर यांनी या भागातील मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठवणार असल्याची माहिती दिली. 

जालना : शहागड महसूलच्या मंडळाअंतर्गत साष्टपिंपळगाव, डोमलगाव, गोरी-गंधारी, शहागड, वाळकेश्वर, कुरण, गोंदी व कोठाळा पर्यंत प्रचंड प्रमाणात अवैध वाळू तस्करी होते. याच पट्ट्यात आज तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनावर कारवाई केली. कारवाईची माहिती देताना भारस्कर यांनी या भागातील मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठवणार असल्याची माहिती दिली. 

शहागड येथे अवैध वाळू तस्करी बंद झाल्याचे चित्र वरून दिसते. मात्र ,आतून वाळू तस्कर कायद्याला न जुमानता या भागात धुमाकूळ घालत आहेत. यावर महसूल व पोलीस प्रशासना यांचे काही प्रमाणात दुर्लक्ष होते. याबाबत लोकमत मध्ये वृत्त प्रकाशित होताच आज तहसीलदार दत्ता भारस्कर, राजेश साबळे, अशोक काशीद यांच्या पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणा-या ट्रकवर (एम.एच.20.डीई. 3017 ) कारवाई केली. याप्रकरणी ट्रक मालक गुड्डू बिहारी (रा.अंबड) चालक विष्णू दगडूजी लांडे,(रा.पांगरखेडा) यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. 

मंडळ अधिका-यावर होणार कारवाई या कारवाई बाबत माहिती देताना तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सांगितले कि, या भागातील मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून याची गंभीर दखल घेत प्रशासन त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार आहे.

ग्रामस्थांनी लक्ष घालावे आपेगाव, बेळगाव, साडेगाव या गावात ग्रामस्थ अवैध वाळू वाहतुकीवर लक्ष देऊन असतात यामुळे येथे वाळू तस्करी होत नाही. अशाच प्रकारे वाळू पट्ट्यातील सर्व गावांनी यात लक्ष घालून अवैध वाळू तस्करीला विरोध करावा असे आवाहन भारस्कर यांनी केले आहे.   

टॅग्स :Jalanaजालना