शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुरण येथे अवैध वाळू तस्करांविरुध्द कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:55 IST

अंबड तालुक्यातील कुरण येथील गोदापात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर नुकतीच कारवाई करत गोंदी पोलिसांनी ट्रॅक्टरसह वीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अंबड तालुक्यातील कुरण येथील गोदापात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर नुकतीच कारवाई करत गोंदी पोलिसांनी ट्रॅक्टरसह वीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कुरण येथील गोदापात्रात सर्रास वाळू उपसा सुरू होता. मात्र, कारवाई करण्यासाठी पोलीस व महसूलच्या पथकाला नदीपात्रात जाण्याअगोदरच वाळू तस्कर पळ काढत असे. दरम्यान, कुरण गोदापात्रात ट्रॅॅक्टरमध्ये अवैध वाळू भरत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने कुरण-पाथरवाला रस्त्यावरून अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले.दरम्यान पाळत असतानाही पोलीस कोठून आले म्हणून परिसरातील अवैध वाळू तस्कर भांबावून गेले आहेत. तिन्ही ट्रॅक्टर गोंदी पोलीस ठाण्यात लावून पोलिसांनी चालक अशोक राक्षे, बाळू कुरणकर व अन्य एक अशा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या केलेल्या कारवाईमुळे परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणा-यांची चांगलीच भंबेरी उडाली असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी ही कारवाई केल्यापासून आजपर्यंत नदीपात्रात एकही वाहन आढळून आले नाही.ही कारवाई उपनिरीक्षक हनुमंत वारे, ज्ञानेश्वर मराडे, गणेश लक्कस यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी केल्याची माहिती गोंदी पोलीसांनी दिली.अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडलातळणी : मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना टेम्पो महसूल व पोलीस पथकांनी मंगळवारी रात्री मंठा शहरात पकडला.टाकळखोपा येथील विष्णू लाड यांच्या मालकीचा टेम्पो एम. एच. २१ बी.एच १४२९ हे अवैधरीत्या १ ब्रास वाळूची वाहतूक करताना तलाठी, पोउनि. एम.एस. गटूवार यांना आढळून आले. यानंतर त्यांनी या वाहनावर कारवाई करून टेम्पो मंठा तहसील कार्यालयात जप्त केला आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीPoliceपोलिस