शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांविरुध्द कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:53 IST

आयपीएलवर (इंडियन प्रिमियर लिग) या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्यांच्या मुलांसह तीन बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री मंठा चौफुली परिसरात छापा मारुन कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आयपीएलवर (इंडियन प्रिमियर लिग) या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्यांच्या मुलांसह तीन बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री मंठा चौफुली परिसरात छापा मारुन कारवाई केली. त्याच्याकडून महागडे मोबाईलआणि इतर साहित्य असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे सट्टेबहाद्दरात खळबळ उडाली आहे.शहरातील मंठा चौफुलीजवळील वसू हॉटेलसमोर दोन इसम राजस्थान रॉयल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आयपीएल क्रिकेट सामन्यावर एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप माध्यमातून पैशाची बोली लावून होते. सट्टा मोबाईलवर लावून खेळत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या पथकाला मिळाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासमोर याबाबत खात्री केल्यानंतर पोलिसांनी छापा मारुन सट्टा खेळणारे सागर आनंद सुराणा (२७) सराफागल्ली, आणि दीपक पारसचंद गादिया (२९) सराफा या दोघांना पकडून त्यांच्या ताब्यातून महागडे दोन मोबाईल जप्त केले.जप्त केलेल्या मोबाईलची तपासणी केली असता मोबाईलवर झालेले संभाषण, आणि एसएमएस, आणि व्हॉट्सअ‍ॅपव्दारे क्रिकेट सामन्यावर सट्टा (जुगार) खेळत असल्याचे तपासणीत आढळून आले. यामुळे सुराणा आणि गादीया ज्या बुकीसोबत सट्टा खेळत होते , त्या तीन बुकीवरही पोलिसांनी कारवाई करून सचिन फुलपगर (रा.दानाबाजार), हरीश राजपूत (रा. लोधी मोहल्ला), आणि गोविंद गुप्ता (रा. काद्राबाद) या तिघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकोन मुसक्या आवळल्या.पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणा-यांमध्ये धास्ती पसरली आहे. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांच्या फिर्यादीवरुन जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार पाच जणाविरुध्द तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, रंजित वैराळ, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, विलास चेके आदींनी कामगिरी केली.पोलिसांनी केला तंत्रज्ञानाचा वापरपोलिसांच्या तपास कार्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करुन मोबाईलवरुन सुरु असलेल्या या बेटींग (जुगार) पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना

टॅग्स :IPL 2019आयपीएल 2019Crime Newsगुन्हेगारीJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना