शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ८ कर्मचाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:54 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनुपस्थित आढळलेल्या २ वैद्यकीय अधिका-यांसह ८ कर्मचा-यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनुपस्थित आढळलेल्या २ वैद्यकीय अधिका-यांसह ८ कर्मचा-यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई केली.ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्तदरात उपचार मिळावे, यासाठी जिल्हाभरात ४० आरोग्य केंद्रे व २१० उप आरोग्य केंद्रे कार्यरत आहे. या केंद्रांमार्फत ग्रामस्थांवर उपचार केले जात आहे. परंतु, या केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करीत आहेत. वरिष्ठ अधिका-यांना न सांगता वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिका-यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले.जिल्हा आरोग्य अधिकारी खतगावकर यांनी १६ जुलै रोजी शहागड, सुखापुरी, जामखेड, गोंदी, वडीगोंद्री, नालेवाडी येथील आरोग्य केंद्रांची पाहणी केली. या पहाणीत गोंदी येथील वैद्यकीय अधिकारी अविनाश देशमुख व जामखेड येथील वैद्यकीय अधिकारी पवार हे अनुपस्थित होते. तसेच जामखेड येथील आरोग्य केंद्रात दोन कर्मचारी, वडीगोद्री येथील आरोग्य सहायक, नालेवाडी येथील आरोग्य सेवक, शहागड येथील आरोग्य सेवक, सुखापुरी येथील आरोग्य केंद्रात दोन आरोग्य सहायक व एक कर्मचारी अनुपस्थित आढळून आला.मनमानी कारभारामुळे रुग्णांचे हालग्रामस्थांना स्वस्त दरात उपचार मिळावे, यासाठी शासनाने ग्रामीण भागात आरोग्य केंद्रे सुरु केली आहेत. परंतु, या आरोग्य केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करीत आहेत. त्यांच्या या मनमानी कारभारामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.कारवाईनंतरही कामात कुचराईजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी कामात कुचराई करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई केली होती. यात आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचा-यांचाही समावेश होता. या कारवाईनंतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सध्या तरी अधिकारी सुधारले नसल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय