शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षात ४३ रेशन दुकानदारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:35 IST

स्वस्त धान्य वाटप करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४३ दुकानदारांवर महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वस्त धान्य वाटप करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४३ दुकानदारांवर महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. धान्य कमी देणे, पावती न देणे, ई-पॉस मशीनद्वारे धान्याचे वाटप न करणे इ. विविध कारणांवरून गत दीड वर्षात ही कारवाई करण्यात आली. तर यातील आठ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.जालना जिल्ह्यात १२८० स्वस्त धान्य दुकाने आहेत. तर लाभार्थी कुटुंबांची संख्या ३ लाख २८ हजार ८०६ इतकी आहे. जिल्हा पुरवठा विभागाने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारास ई-पॉस मशीनचे वाटप केले आहे. प्रत्येक दुकानदारास ई-पॉस मशीनद्वारेच धान्य वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांकडून याची अंमलबजावणी सुरु असली तरी काही स्वस्त धान्य दुकानदारांचे ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप कमी आहे.ई-पॉसद्वारे धान्य वितरण वाढविण्याच्या अनुषंगाने आवश्यक सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आल्या होत्या. परंतु, तरीही स्वस्त धान्य दुकानदार ई-पॉसद्वारे धान्याचे वाटप करीत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. तसेच लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, पावती न देणे इ. प्रकारच्या ४२ तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. या तक्रारांची दखल घेत तहसीलदारांच्या अहवालावरून जिल्हा पुरवठा अधिका-यांनी दोन वर्षात ४३ दुकानदारांवर कारवाई केली आहे.यात ८ दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर १५ दुकानदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. १२ जणांचा परवाना पूर्ववत तर ८ जणांना सक्त ताकीद देण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एम. बसैय्ये यांनी सांगितले.अनेक गावे : दुकानदारांवर कारवाईजालना तालुक्यातील पाष्टा, हिवर्डी, जालना, मंठा तालुक्यातील लिंबोणी, पांगरा गडदे, पांगरी, दु. क्र. १५, रानमाळा, शिवणगिरी, लावणी, गोसावी पांगरी, अंबड तालुक्यातील हसनापूर, लखमापुरी, देशगव्हाण, भगवानगर, काटखेडा, रुई, किनगाव, डोमेगाव, बदनापूर तालुक्यातील चितोडा, वाल्हा, डावरगाव, बुटेगाव, वाल्हा, रोषणगाव, वरुडी, देवगाव येथील २, भोकरदन तालुक्यातील ईटा, बोरगाव, उमरखेडा, गोंदी, जानेफळ, बोरगाव, शेलूद, जाफराबाद तालुक्यातील कोळेगाव, परतूर तालुक्यातील वाटूरफाटा, कोकाटे हादगाव, आंबा, दहिफळे, घनसावंगी तालुक्यातील पांगरा गावातील दुकानदारांवर गत दोन वर्षात कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :foodअन्नRevenue Departmentमहसूल विभागsuspensionनिलंबन