शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसांत २१२ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:36 IST

सहा दिवसांत ई-चालानद्वारे २१२ जणांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की, पोलिसांच्या खिशात, याबाबतही संशय व्यक्त केला जातो. यामुळे यात पारदर्शकता आणण्यासाठी गृहविभागाने ई - चालान पद्धती सुरु करण्याचा निर्णय घेतला. जालना शहरात मंगळवारपासून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून, मागील सहा दिवसांत ई-चालानद्वारे २१२ जणांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.रस्त्यावर धावतांना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. यामुळे गृहविभागाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कागदी चालान बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची जरब वाढणार आहे. यापूर्वीच काही जिल्ह्यात एक राज्य एक ई -चालान प्रणालीव्दारे वाहतूक शाखा स्मार्ट झाल्या होत्या. मात्र, जालना जिल्ह्यातील अंमलबजावणी खोळंबली होती. गृह विभागाने वाहतूक शाखेला पत्र पाठवून याविषयी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना केल्या. यामुळे जिल्ह्यातील ७७ पोलीस कर्मचाऱ्यांना या मशिनविषयी प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर मंगळवारी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या हस्ते सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रणालीसाठी एम- स्वाईप मशिन पुरविण्यात आल्या आहेत. मोबाईलसारखी ही मशिन आहे. त्याला ब्लूटूथने प्रिंटर जोडले आहे. या पध्दतीमुळे चोरीचे वाहन, चालकाचा परवाना याची माहितीही तत्काळ मिळणार आहे. दंडाची रक्कम थेट अपर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेकडे जमा होणार आहे. मागील सहा दिवसात वाहतूक शाखेने २१२ जणांवर ई-चालनाद्वारे कारवाई केली आहे. यात मंगळवारी १९, बुधवारी २६, गुरुवारी ४८, शुक्रवारी ५४, शनिवारी ६५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.भ्रष्टाचारास बसणार चापवाहतुकीला शिस्त लावताना वाहनांवर विविध नियमानुसार दंड आकारला जातो. अनेकदा हा दंड अवास्तव असल्याची ओरड होते. दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की नाही, याबाबत संशय घेण्यात येतो. यात पादर्शकता यावी या उद्देशाने ई-चालान प्रणाली सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.फाडलेल्या चालानवर शासकीय नियमानूसार दंडाची रक्कम राहणार आहे. ती रक्कम अपर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेला तत्काळ नोंदविली जाणार आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडी