शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

‘समृद्धी’वर सात दिवसांत ३० वाहनांना अपघात, शिर्डी ते नागपूरपर्यंत अपघातांची मालिकाच

By दिपक ढोले  | Updated: December 19, 2022 12:30 IST

टकाटक असलेल्या या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवीत आहेत.

दीपक ढोले जालना : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. टकाटक असलेल्या या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवीत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सात दिवसांमध्ये जवळपास ३० वाहनांना अपघात झाला असून, ६५ घटनांमध्ये वन्यप्राण्यांना दुखापत झाली आहे, तर दोन ठिकाणी वाहनांना आगदेखील लागली आहे.  सहा वन्यप्राण्यांचा जीव गेला आहे.   

राज्याची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरला जाण्यासाठी ११ ते १२ तास लागतात. हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारने समृद्धी महामार्ग तयार केला.  नागपूर ते शिर्डीपर्यंतचे ५२० किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. या महामार्गावर १२० पर्यंत वेगमर्यादा देण्यात आली आहे. परंतु, लोक अतिवेगाने वाहने चालवीत असल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत जवळपास ३० वाहनांचा अपघात झाला आहे. 

समृद्धी महामार्गावरून वाहनधारक वेगमर्यादेपेक्षा अधिक गतीने वाहने चालवित आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. शिर्डीपासून ते नागपूरपर्यंत जवळपास ३० वाहनांना अपघात झाला आहे. तर ६५ घटनांमध्ये वन्यप्राण्यांना दुखापत झाली आहे. दोन वाहनांना आगदेखील लागली आहे. वाहनधारकांनी खबरदारी घ्यावी.   अभय बी. दंडगव्हाळ, सपोनि. महामार्ग पोलीस, जालना 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात