शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भाचीला गावाकडे नेणाऱ्या मामाचा अपघाती मृत्यू; मुलीसह वडील गंभीर जखमी

By विजय मुंडे  | Updated: December 23, 2023 19:38 IST

मालवाहतूक वाहनाची दुचाकीला धडक

परतूर : भाचीला गावाकडे नेणाऱ्या मामाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी वाटूर मार्गावरील कंडारी पाटीजवळ घडली. मालवाहतूक वाहनाने विरुद्ध दिशेने येत दुचाकीला जाेराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुलीसह तिचे वडीलही गंभीर जखमी झाले आहेत.

नितीन जनार्दन नरवडे (वय ४५, रा. नांदलगाव, ता. पैठण) असे मयताचे नाव आहे. तर विनोद सदाशिव पांडे (वय ५०), प्रेरणा विनोद पांडे (वय १७, सर्व रा. बीडकिण, ता. पैठण) अशी जखमींची नावे आहेत. नांदलगाव येथील प्रेरणा पांडे ही मुलगी आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत आहे. प्रेरणा पांडे हिला गावाकडे नेण्यासाठी तिचे वडील विनोद पांडे, मामा नितीन नरवडे हे दोघे शनिवारी जवाहर नवोदय विद्यालयात आले होते. प्रेरणाला घेऊन ते दोघे दुचाकीवरून (एमएच २० - एफआर ७४९१) गावाकडे परत निघाले होते. त्यांची दुचाकी वाटूर मार्गावरील कंडारी पाटीजवळ असताना समोरून विरुद्ध दिशेने आलेल्या एका मालवाहतूक वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.

या अपघातात नितीन नरवडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रेरणा पांडे व तिचे वडील विनोद पांडे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मालवाहतूक चालक वाहनासह फरार झाला. पो.हे.कॉ. शेख, पो.कॉ. रामेश्वर माने यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

प्राचार्यांनी नाकारली हाेती सुटीप्रेरणाला गावाकडे नेण्यासाठी पालकांनी प्राचार्यांकडे विनंती केली होती. त्यावेळी प्राचार्यांनी सुटी नाकारली होती. परंतु, आजाराचे कारण पुढे करीत पालक प्रेरणाला गावाकडे घेऊन निघाले. दरम्यान, अपघातात तिच्या मामांचा मृत्यू तर वडिलांसह प्रेरणा जखमी झाली. या घटनेने जवाहर नवोदय विद्यालय परिसरातही हळहळ व्यक्त केली जात होती.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघात