शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परतूर-वाटूर रोडवर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:12 IST

परतूर - वाटूर रोडवर पिंपरखेडा पाटीवर एका भरधाव इंडिकाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर - वाटूर रोडवर पिंपरखेडा पाटीवर एका भरधाव इंडिकाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जालन्यातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.वाटूरहून परतूरकडे इंडिका क्रमांक (एम एच. ४९ बी.५१४१) ही भरधाव वेगाने जात असतांना पिंपरखेडा पाटीजवळ दुचाकी (क्र. एम. एच. बीजे. ९९७४) हिला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील भागवत चिंचाणे आणि पिंटू मुळे हे गंभीर जखमी झाले.इंडिकामधील दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. दरम्यान, अपघात जखमी झालेल्या दुचाकी स्वारांवर जालना येथील एका रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याने येथे गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. या अपघाताची पोलिसांत नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.यातील जखमी पिंटू मुळे यांच्या मुलीचा विवाह सोहळा दि. ११ रोज सोमवारी होता, यामुळे लग्नातील भाजीसाठी हे मोटार सायकलस्वार परतूरला वांगे व इतर भाजीपाला आणण्यासाठी येत होते. या अपघातानंतर भाजी पाला आणण्यासाठीचे पोते या इतरत्र विखुरले होते. ऐन लग्नाच्या घाईतच वधू पित्यावर हे संकट कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.परतूर वाटूर रोडचे रूंदीकरणा बरोबरच सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. ज्या भागात रोडचे काम पूर्ण झाले आहे. त्या भागात वाहनांचा वेग वाढण्या बरोबरच अपघातही होत आहेत. हा अपघातही असाच चांगल्या रस्त्यावर घडला आहे.

टॅग्स :Accidentअपघातcarकार