शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीस धडक; युवक ठार, भाचा जखमी

By विजय मुंडे  | Updated: May 29, 2024 18:51 IST

साष्टपिंपळगाव शिवारातील घटना : बळेगाव गावावर शोककळा

वडीगोद्री (जि. जालना) : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर मृताचा भाचा जखमी झाला. ही घटना शहागड-पैठण मार्गावरील साष्टपिंपळगावजवळ मंगळवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

सोपान जनार्धन टेकाळे (वय ३०, रा. बळेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. सोपान टेकाळे व त्याचा भाचा सुरज संतोष राखुंडे (वय १४, रा. सुखापुरी) हे मंगळवारी रात्री दुचाकीवरून शहागड येथून बळेगावकडे जात होते. त्यांच्या दुचाकीस रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास साष्टपिंपळगाव शिवारात आली असता एका अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. यात सोपान टेकाळे हा गंभीर जखमी झाला. तर त्यांचा भाचा सुरज हा रस्त्याच्या कडेला असलेल्या काट्यात पडल्याने त्याच्या डोक्यात काटे घुसले असून, तो किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर वाळूचे ट्रॅक्टर पसार झाले. 

घटनेची माहिती मिळताच बळेगाव व साष्ट पिंपळगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी येऊन टेकाळे याला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. या प्रकरणात बुधवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे तरुणाचा मृत्यू झाल्याने नागरिकांतून रोष व्यक्त होत आहे. सोपान टेकाळे याच्या अपघाती मृत्यूमुळे बळेगाव गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी एक दीड वर्षाचा मुलगा, भावजय व पुतणे असा परिवार आहे.

टेकाळे कुटुंबातील दुसऱ्या मुलाचाही अपघाती मृत्यूबळेगाव येथील टेकाळे यांच्या कुटुंबातील भारतीय सैन्य दलात असलेला ज्ञानेश्वर या मोठ्या मुलाचा २८ जून २०१४ रोजी कुलरचा शॉक लागून अपघाती मृत्यू झाला होता. तर शहागड वरून बळेगावकडे जाताना मंगळवारी २८ मे रोजी रात्री सोपान टेकाळे याचा अपघाती मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन्ही युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने टेकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालना