शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षण अभ्यासासाठी नऊ जणांची समिती जाणार इतर राज्यात - गोपीचंद पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 15:15 IST

जर आरक्षण मिळाले नाही तर विधान भवनावर मोर्चा काढणार

जालना : आम्ही आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ज्याप्रमाणे रस्त्यावर लढतोय, त्याप्रमाणेच न्यायालयातही लढतोय. सरकारही आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असून, सरकारने एक समिती तयार केली आहे. ही समिती दोन ते तीन दिवसांत इतर राज्यात जाऊन अभ्यास करणार आहे. त्यात नऊ जणांचा समावेश आहे. जर सरकारने आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही विधानभवनावर मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी जालना शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले की, कोणत्याही हिंसेचे आम्ही समर्थन करीत नाही, आम्ही निषेधच करतो; परंतु, २१ नोव्हेंबर रोजी जी घटना घडली, ती घटना घडविण्यामागे कोण होते. धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी, समाजबांधवांशी असंवेदनशीलपणे ज्यांनी वागणूक दिली, त्यांची चौकशी करण्याची मागणी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारला आमची विनंती आहे, ज्या पद्धतीने चुकीचे गुन्हे नोंदविले आहे, ते मागे घेण्यात यावे. काही ओबीसी बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला; परंतु, त्यांची नावे जाणूनबुजून टाकण्यात आली आहे. आरक्षणासाठी सरकारला ५० दिवसांचा कालावधी दिला होता; परंतु, सरकारने आरक्षण दिले नाही. राज्यात धनगड समाज नाही. त्याला धनगर समजून सरकारने जीआर काढावा. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन धनगर समाजाला एसटीचे जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली होती;

परंतु, सरकारने आम्हाला ते अधिकार नसल्याचे सांगितले. मग आम्ही त्यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि बिहार येथील जीआर दाखविले. त्यानंतर सरकारने याचा अभ्यास करण्यासाठी नऊ जणांची कमिटी नियुक्ती केली आहे. दोन ते तीन दिवसांत ती समिती इतर राज्यांत पाठविली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आम्हाला अभिमान आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आरक्षण दिले. आमचे एकच साहेब आहेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरसाहेब. काही पुरागामी नेते समजणारे त्यांच्या नेतृत्वात अनेक जातीवादी आता आरक्षण मागतात; परंतु, ते साधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नावही घ्यायला तयार नाही. त्यांचा सन्मानही करायला तयार नाही, असेही ते म्हणाले.

आयजी आणि जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीजालना येथील घटनेबाबत मी अपर पोलिस अधीक्षकांशी बोललो होतो. ते म्हणाले की, काही नुकसान झाले नाही. आम्ही किरकोळ केस दाखल करतो. दहा लोकांची नावे द्या. त्यानंतर मी दहा लाेकांची नावे देण्यास सांगितले; परंतु, नंतर आयजी आले, त्यानंतर काय किल्ली फिरली. त्यांनी ३६ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्यामागे कोणी अदृश्य शक्ती आहे का, त्यामुळे त्यांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी मी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पवारांना तुम्ही प्रश्न विचारला?जर धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी आमदार पडळकर यांना विचारला. त्यावर उत्तर देताना पडळकर म्हणाले की, पवारांना तुम्ही असा प्रश्न विचारला का की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? मी ताकदीने लढतोय, समाज माझ्या पाठीमागे आहे, असे सांगून ते म्हणाले की, जर आरक्षण मिळाले नाही तर विधान भवनावर मोर्चा काढणार आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षण