शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

'मला जगायचा कंटाळा आलाय', सुसाईड नोट लिहून २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

By दिपक ढोले  | Updated: May 19, 2023 16:40 IST

तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्याचे आई-वडील बाहेरगावी शेतमजूर म्हणून काम करतात.

परतूर : मला जगायचा कंटाळ आलाय, म्हणून मी आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी लिहून परतूर तालुक्यातील शिंगोना येथील एका २५ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. अनिल यादवराव कांबळे (२५) असे मयत तरूणाचे नाव आहे.

अनिल कांबळे या तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्याचे आई-वडील बाहेरगावी शेतमजूर म्हणून काम करतात. अविवाहित असलेला अनिल कांबळे हा गावातीलच मामाकडे राहतो. मामाने त्याला ऑटोरिक्षा खरेदी करून दिली होती. ही ऑटोरिक्षा चालवून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता. गेल्या काही दिवसांपासून मनस्थिती ठीक नसलेल्या अनिल कांबळे याने गुरूवारी दुपारी राहत्या घरात स्वतःला बंद करून घेत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून, त्यात मला जगायचा कंटाळा आलाय, म्हणून मी आत्महत्या करतोय, असा मजकूर लिहिलेला आहे. गावात राहणाऱ्या मामा-मामींकडेच त्याचे सर्व बालपण आणि मोठेपण गेले होते. अत्यंत मेहनती व गरीब असलेल्या या तरुणाने आत्महत्या केल्याने शिंगोना ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत आहेत. घटनेची माहिती कळताच परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक गाढवे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह परतूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. रात्री उशिरा शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना